आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारातील घसरण अद्याप थांबलेली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील शेअर बाजारात सुरुवातीला मिळालेल्या मजबूत संकेतांनंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाला. यात चीनमधील औद्योगिक उत्पादनाच्या खराब आकडेवारीचा जास्त परिणाम दिसला. यामुळे जागतिक विकासाच्या गतीबाबत चिंता वाढली आहे. "कायझन पीएमआय'नुसार चीनमधील औद्योगिक उत्पादन ४९.४ नोंदवण्यात आले असून यात सलग १४ व्या महिन्यात घट आली आहे. बाजाराला ४९.९ पीएमआय राहण्याची अपेक्षा होती. मात्र, तेथील मागणी कमी झाल्यामुळे कंपन्यांमधील रोजगार तेजीने कमी होत आहेत. निर्यातीतदेखील नवीन ऑर्डर मिळण्याची संख्या सलग पाचव्या महिन्यात कमी झाली आहे, तर रोजगार सलग ३० व्या महिन्यात घटले आहेत. ऑस्ट्रेलियामधूनदेखील सकारात्मक बातमी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियातील सेंट्रल बँकेच्या वतीने अचानक व्याजदरात कपात करून ते १.७५ टक्के विक्रमी नीचांकी पातळीवर आणल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता आणखी वाढली आहे. मध्य पूर्व आणि उत्तर समुद्री भागात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे याच्या किमतीत घसरण कायम राहिली. यामुळे तेलाचा जागतिक पुरवठा वाढण्यासंदर्भातील चिंता वाढली आहे.

पुढील काळात बाजारात घसरण कायम राहू शकते. जागतिक चिंतांमुळे बाजाराची धारणा कमजाेर आहे. याव्यतिरिक्त भारतीय उत्पादन पीएमआयमध्येदेखील तेजीने घसरण होत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. यात एप्रिलमध्ये घट झाली असून पीएमआय ५०.४ नोंदवण्यात आला आहे. मार्चमध्ये तो ५२.५ वर होता. यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीमधील "पुलबॅक' सध्या नाजूक स्थितीत आहे. त्याला ७७१५ अंकांच्या जवळपास चांगला आधार मिळेल, जो त्याची सध्याची पातळी ७७४७ च्या सध्याच्या बंदच्या खूपच जवळ आहे. हा एक चांगला अाधार असेल. जर निफ्टी या पातळीच्याही खाली गेला तर त्याला ७६३६ अंकांच्या जवळ आधार मिळेल. हा एक महत्त्वाचा आधार असेल. या पातळीच्या पुढे निफ्टीला ७५१६ अंकांच्या जवळ आधार मिळेल.

वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पुढचा रेझिस्टन्स ७७८७ अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स असेल. निफ्टी या पातळीच्या वरती जाऊन बंद झाल्यास बाजारात सकारात्मकता वाढेल. अशा स्थितीत निफ्टी ७८२० पर्यंत पोहोचू शकतो. हा वाढत्या निफ्टीसाठी महत्त्वाचा रेझिस्टन्स असेल. माझ्या मते निफ्टीला पुढचा रेझिस्टन्स ७८८९ अंकांच्या जवळ मिळेल. ही पातळी निफ्टीची पुढील दिशा ठरवेल. शेअरमध्ये या आठवड्यात अॅक्सिस बँक चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. याचा सध्याचा बंद भाव ४७०.५५ रुपये आहे. तो ४७७ पर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत त्याला ४६२ रुपयांवर आधार आहे, तर जेएसडब्ल्यू स्टील सध्या कमजोर असल्याचे दिसत असून त्याचा सध्याचा बंद भाव १,३५६.८० आहे. घसरणीत याला १,३४० रुपये आधार आहे, तर तेजीमध्ये तो १,३७५ रुपयांपर्यंत वाढू शकतो.

विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.comचे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...