आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीची शक्यता, जागतिक संकेतांवर ठरेल दिशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यातभारतीय शेअर बाजारात अपेक्षेप्रमाणे मर्यादेत व्यवहार झाले. अमेरिकेत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय मंगळवार आणि बुधवारी नियोजित बैठकीत होईल, तर २३ जूनला इंग्लंडमध्ये "ब्रेक्सिट रेफरंडम' होणार असून यामध्ये इंग्लंडमधील नागरिक युरोपीय संघात (ईयू) राहायचे की नाही याबाबत मतदान करणार आहेत. या दोन्ही घटना जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या घटनांमध्ये समोर येणाऱ्या निकालाच्या प्रतीक्षेत भारतासह जगभरातील बाजारात मर्यादेत व्यवहार राहण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणात फेडरल रिझर्व्ह सध्यातरी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेईल असे वाटत नसले तरी प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत काही काळ थांबलेलेच बरे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेत रोजगाराची आकडेवारी जाहीर झाली असून त्यात घसरण झाल्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. इतर आर्थिक क्षेत्रातही जागतिक पातळीवर प्रोत्साहन मिळेल असे काही घडण्याचे संकेत नाहीत. मंगळवारी अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

भारतीय बाजारातील धारणा मुख्यत: जागतिक संकेतांवर अवलंबून राहणार आहे. फेडची बैठक आणि इंग्लंडमधील निर्णय जाहीर होण्याआधी भारतीय बाजारात मर्यादेत व्यवहार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीबाबत नकारात्मकता कायम आहे. एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात ०.८ टक्क्यांची घट झाली असून मे महिन्यात महागाईत वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर ०.७९ टक्के, तर किरकोळ महागाई दर ५.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थ आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे या दोन्ही प्रकारच्या महागाईत वाढ झाली आहे.
ही भारतीय अर्थव्यवस्था तसेच शेअर बाजारासाठी चांगली बातमी नाही. कारण यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी होते. वास्तविक यंदा चांगल्या मान्सूनची अपेक्षा असल्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून महागाई कमी होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत या आठवड्यात शेअर बाजारात मंदीची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या बाजारात पुढील काळात घसरणीची शक्यता असून सोबतच कन्सॉलिडेशन झोनमध्ये कायम राहील. निफ्टी ८१५२ अंकांच्या खाली असल्यामुळे नकारात्मक संकेत कायम आहेत. यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीला महत्त्वाचा आधार ७८०३ च्या पातळीवर मिळेल. वास्तविक याआधी ८०३४ आणि ७९४० च्या पातळीवरदेखील महत्त्वपूर्ण आधार मिळेल.

वाढीचा विचार केल्यास िनफ्टीला पहिला अर्थपूर्ण रेझिस्टन्स ८१६१ अंकावर मिळेल. हा एक महत्त्वपूर्ण आधार असेल, तर निफ्टी चांगल्या व्हॉल्यूमसह या पातळीच्या वरती बंद झाला तर बाजारातील नकारात्मकता संपण्यास मदत होईल. या पातळीच्या वर निफ्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर निफ्टीला पुढचा अर्थपूर्ण आधार ८२१७ वर आणि मजबूत रेझिस्टन्स ८२९६ च्या पातळीवर मिळेल. शेअरमध्ये या आठवड्यात टीव्हीएस मोटार आणि आयडिया सेल्युलर चांगल्या स्थितीत दिसत आहे. टीव्हीएस मोटारचा सध्याचा बंद भाव २९०.२५ रुपये आहेे. तो २९६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला २८४ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. आयडिया सेल्युलरचा सध्याचा बंद भाव ९९.७५ रुपये असून तो १०४ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला ९७ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.
(लेखक तांत्रिक विश्लेषक moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
(vipul.verma@dbcorp.in)