आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन ब्रेग्झिट : बाजारात राहील सतर्कतेचे वातावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये २३ जून रोजी ब्रेग्झिटवर जनमत घेतले जाणार आहे. ब्रिटन युरोपीय संघात राहील की बाहेर पडणार याचा निर्णय घेण्यासाठी देशातील जनता मत देणार आहे. याचा निकाल २४ जूनला लागेल. या प्रकारामुळे जगभरातील शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण दिसून येते. ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला तर ब्रिटनसह संपूर्ण जगाला वित्तीय संकटाचा सामना करावा लागणार आहे.

मागील आठवड्यात ब्रिटनमधील खासदाराची हत्या झाल्यानंतर युरोपीय संघातून बाहेर पडू नये, अशी भावना निर्माण झाली होती. परिणामी सोमवारी दुपारनंतर बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांनी आर्थिक विकास सुस्त राहणार असल्याचे भाकीत वर्तवल्यानंतर बाजारात सतर्कता वाढली आहे. या वर्षी दोनदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने बाजारासाठी हे अशुभ संकेत मानले जात आहेत. यामुळेच अमेरिकेसह अन्य बाजारात घसरण पाहता आली.

भारतीय शेअर बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, मागील आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) बाजारात तेजी आणि मंदी आल्याच्या बातम्या पसरल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि बँकेचा विश्वसनीय चेहरा म्हणून ओळख असलेल्या रघुराम राजन यांनी पुन्हा पदभार घेण्यास नकार दिल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. गव्हर्नर म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे, परंतु ब्रेग्झिटसंदर्भात भीती कमी करण्यासाठी काढण्यात आलेली रॅली आणि सरकारद्वारे संरक्षण, विमान वाहतुकीसह अनेक क्षेत्रांत शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिल्याने सोमवार दुपारनंतर काही प्रमाणात निराशा कमी झाली.

आर्थिक सुधारणेमुळे बाजारात दिलासादायक वातावरण पाहायला मिळाले. वास्तविक पाहता मंगळवारी व्यावसायिकांनी बराच नफा कमावला. कारण गुरुवारी होणाऱ्या ब्रेक्झिट जनमतापूर्वी कोणीही जोखीम घेण्यास तयार नाही. शुक्रवारी ब्रेग्झिटचा निकाल येईपर्यंत जगातील शेअर बाजारात सतर्कतेचे वातावरण राहणार आहे. दररोज किंवा आठवड्याला शेअर खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जनमतानंतरच यासंदर्भात निर्णय घेणे योग्य राहील, असे मला वाटते. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या वेळेला काही चिंता नाही.

तांत्रिकदृष्ट्या पाहता अल्पकाळात निफ्टीला ८,२६८ अंकाच्या पातळीवर अडथळा आहे आणि ८,१५७ या पातळीवर आधार आहे. हे दोन्ही स्तर मंगळवारी निफ्टी बंद झाला त्या स्तराच्या अगदी जवळ म्हणजे ८,२१९ वर आहेत. वास्तविक पाहता हे दोन्ही स्तर अर्थपूर्ण पातळीवर आहेत. निफ्टी जर या कक्षेबाहेर घसरणीसह किंवा तेजीसह बाहेर पडला तर त्या दिशेने वाढण्याचा तो संकेत मानावा. चांगला खरेदीसह निफ्टी ८,२६८ वर बंद झाला, तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

याव्यक्तिरिक्त ८,३४१ वर निफ्टीला अडसर ठरू शकतो. अशा स्थितीत निफ्टी ८,१५७ अंकाच्या खाली आला तर विक्रीचा दबाव दिसून येऊ शकतो. अशातच पुढील आधार ८०६३ च्या आसपास मिळेल. हा एक तगडा आधार आहे. समजा ब्रिटनमधील सार्वमताने बाजाराचा अपेक्षाभंग केला तर निफ्टीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर निफ्टी ७,९५७ पर्यंत खाली घसरू शकतो.
समभागाच्या बाबतीत सांगायचे झाले तर या आठवड्यात जेएसडब्ल्यू स्टील आणि हीरो मोटोकॉर्प हे समभाग उत्तम स्थितीत दिसताहेत.
जेएसडब्ल्यू स्टीलचा सध्याचा बंद भाव हा १,४००.७० रुपये आहे. हा भाव १,४२८ पर्यंत जाऊ शकतो. घसरणीमध्ये याला १,३७८ रुपयांवर आधार आहे, तर हीरो मोटोकॉर्पचा सध्याचा बंद भाव ३,०५३.०५ रुपये आहे. यात ३,१०२ रुपयांपर्यंत वाढ मिळू शकते. घसरणीत याला ३,०३१ रुपयांवर आधार आहे.

विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.comचे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...