आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराचे लक्ष मान्सून आणि ग्रीस संकटावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजारात आठ दिवसांपासून चांगली स्थिती कायम आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात चांगली स्थिती आहे. ही वाढ सर्वच क्षेत्रांमध्ये दिसत आहे. याची दोन कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे मान्सूनची स्थिती आणि दुसरे ग्रीसचे संकट टळण्याची शक्यता. चांगल्या मान्सूनमुळे वेळेच्या आधीच रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रीस संकटावरही मार्ग सापडण्याची आशा आहे.

जागतिक स्तरावर विचार केल्यास ग्रीसचे संकट टळण्याच्या आशेने खरेदी वाढली आहे. गुंतवणूकदारांना चिंता होती की, ग्रीसने कर्ज परत करण्यास नकार दिल्यास तो युरोझोनमधून बाहेर जाईल. यामुळे युरोपियन युनियनच्या आर्थिक मजबुतीवर शंका उत्पन्न होऊ शकते. सोमवारी ग्रीसने सुधारण्यासाठी नवा प्रस्ताव दिला
आहे. युरोझोनमधील इतर देशांनी त्याचे स्वागत केल्यामुळे आशा वाढल्या आहेत.

अमेरिकेच्या एकूणच सकारात्मक आर्थिक आकड्यांमुळेही मजबुती आली आहे. आकडेवारीनुसार अमेरिकी अर्थव्यवस्था रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. मे महिन्यात घरांची विक्रीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. ही गेल्या साडेपाच वर्षांतील सर्वाधिक चांगली स्थिती आहे.

पुढील काळात बाजाराचे लक्ष मान्सूनवर असेल. पावसाची स्थिती चांगली असेल तर बाजारात आणखी सुधारणा दिसून येतील. ग्रीसवर होणार्‍या अंतिम निर्णयाकडेही लक्ष असेल. ग्रीसचा नवा प्रस्ताव आणि युरोझोनची बेलआऊट पॅकेज समस्या हा कायमस्वरूपी तोडगा नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ग्रीस आणि युरोझोनसाठी हे संकट आणखी बर्‍याच काळासाठी राहणार आहे. याबाबतीत ठोस पावले उचलली गेली तर जागतिक बाजारात वाढ दिसेल. वास्तविक बाजाराने सर्व सकारात्मक संकेतांचा अवलंब केला असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पुढील काळात नव्या ट्रिगरची आवश्यकता आहे. नसता पुन्हा पडझड पाहायला मिळू शकते. तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास बाजारात सध्या संथ गती पाहायला मिळत आहे. मंगळवारी बाजार सर्वोच्च पातळीवर जाण्याचे संकेत मिळाले होते. तांत्रिक दृष्टीने पुढील काळात निफ्टी पडू शकतो. याला तांत्रिक कारण असेल. त्यानंतर पुन्हा बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येईल.

निफ्टीला वरच्या पातळीवर पहिला रेझिस्टन्स ८४४८ वर मिळू शकतो. जर निफ्टी याच्याही वर बंद झाला तर हळूहळू ९५०३ पर्यंत जाऊ शकतो. यात निफ्टी आणखी वर जाण्याची शक्यता कमी आहे.

पडझड झाल्यास निफ्टीला पहिला आधार ८३३६ अंकांवर मिळेल. मात्र, हा मजबूत आधार नसेल. याच्या पुढे गेल्यास पहिला रेझिस्टन्स ८१८७ वर असेल. या पातळीवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. वास्तविक या पातळीवर आल्यावर निफ्टी वर जाण्याची शक्यता आहे. मात्र, जर ही पातळी ओलांडली तर निफ्टी ८०५२ पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. शेअरच्या बाबतीत या आठवड्यात टाटा मोटर्स आणि रिलायन्स इन्फ्रा चांगल्या स्थितीत दिसत आहेत. टाटा मोटर्स ४३६ रुपयांवर बंद झाला. तो खाली ४२८ तर वर ४४७ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स इन्फ्रा ३७७.७५ रुपयांवर बंद झाला. तो खाली ३६८ तर वर ३८६ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...