आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी संकेतांवर अवलंबून राहील बाजाराची दिशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यातदेशातील शेअर बाजार पूर्णपणे ग्रीसमधील घटनाक्रमानुसार खाली-वर होत होता. सोमवारी ग्रीसला बेलआउट पॅकेज देण्यासाठी युरोपीय संघातील देश तयार झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली दिसली. या सामंजस्य करारानुसार ग्रीसला तीन वर्षांत ९५ अब्ज डॉलरची मदत मिळण्याची शक्यता आहे. या सशर्त करारानुसार ग्रीसला आर्थिक घडी बसवण्यासाठी कडक नियम अवलंबावे लागणार आहेत. शेअर बाजाराचा ग्रीसमधील घटनाक्रमाचा पूर्णपणे अभ्यास झाला आहे. त्यामुळेच सोमवारी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. तरीदेखील आणखीही काही घटना आहेत, ज्याचा सरळ परिणाम येणाऱ्या काळात बाजारावर होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारासमोर चीनचे आणखीन एक संकट उभे अाहे. तसे पाहिले तर चीन सरकारने उचललेले कडक पाऊल आणि केलेल्या सुधारणा यामुळे शेअर बाजारात सुधारणा दिसून आली. व्यवहाराच्या चार सत्रांपैकी तीन सत्रांमध्ये वाढ झाली आहे. असे असले तरी मंगळवारी बाजारात मोठी पडझड पाहण्यास मिळाली. जून महिन्यात चीनमधील आयात कमी झाली असून िनर्यात वाढली आहे. जागतिक बाजारात सुधारणा होत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
देशांतर्गत विचार केल्यास आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. मे महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन घटून २.७० टक्के झाले आहे. किरकोळ महागाई जून महिन्यात वाढून ५.४० टक्के नोंदवण्यात आली आहे. आर्थिक सुधारणा होत नसल्यानेच औद्योगिक उत्पादनात घट होत असल्याचे मानले जात आहे, तर किरकोळ महागाई दरात झालेल्या वाढीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने पतधोरण आढावा बैठकीत व्याजदरात घट करण्याची आशा कमी झाली आहे. जोपर्यंत महागाई कमी होण्यासाठी काही विशेष उपाय होत नाहीत, तोपर्यंत बाजाराची स्थिती डळमळीत राहू शकते. गेल्या आठवड्यात कंपन्यांची तीन महिन्यांतील आकडेवारीदेखील अपेक्षेप्रमाणेच होती. गुंतवणूकदारांची कंपन्यांच्या पुढील आकडेवारीवर नजर असायला हवी. एकूणच शेअर बाजारात सध्या पाया मजबूत आणि स्थिर अाहे. त्यामुळे पुढे मिळणाऱ्या संकेतांवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास बाजार सकारात्मक आहे. जोपर्यंत निफ्टी ८५२५ च्या वर बंद होत नाही तोपर्यंत तो ८५२५-८३०९ अंकांच्या दरम्यानच राहील. या अंकाच्या वर किंवा खाली बंद होणे म्हणजे कमी कालावधीत स्थिती दर्शवण्याचे संकेत मानले जातील.
आपण वाढीचा विचार केल्यास निफ्टीला वर ८४८६ अंकांच्या जवळ पहिला रेझिस्टन्स मिळेल. हा एक मध्यम, मात्र महत्त्वपूर्ण आधार असेल. आणि जर तो याच्याही वर बंद झाला तर ८५२५ ला पहिला आधार मिळेल. जर निफ्टी या पातळीच्या वर जाण्यास यशस्वी झाला तर त्याला आणखी वाढ मिळण्याची शक्यता आहे.
पडझडीबाबत निफ्टीला पहिला महत्त्वपूर्ण आधार ८३७६ अंकांच्या जवळपास मिळेल. जर निफ्टी या पातळीच्या वर गेला तर बाजारात सकारात्मकता असल्याचे मानले जाईल. मात्र, जर निफ्टी या पातळीच्या खाली बंद झाला तर दबाव वाढेल. अशा स्थितीत निफ्टीला पहिला आधार ८३०९ अंकांच्या जवळ मिळेल. याच्याही खाली निफ्टी बंद झाला तर बाजारात आणखी पडझड होण्याची शक्यता आहे.
शेअरच्या बाबतीत या आठवड्यात टायटन कंपनी आणि टेक महिंद्रा चांगल्या स्थितीत आहेत. टायटनचा बंद भाव ३५९.८५ रुपये आहे, तर पुढील लक्ष्य ३६६ आणि कमीत कमी ३५४ रुपये आहे. टेक महिंद्राचा सध्याचा बंद भाव ४७६.९० रुपये आहे, तर पुढील लक्ष्य ४८४ रुपये आणि कमीत कमी ४६८ रुपये आहे.

लेखकतांत्रिक विश्लेषक moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...