आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेड रिझर्व्हची बैठक, कच्चे तेल देईल बाजाराला दिशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजारातीलप्रमुख निर्देशांक आणि शेअर मंगळवारी दिवसभराच्या नीचांकी पातळीवर गेले आणि नंतर पुन्हा सकारात्मक वातावरणामुळे चढले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली सुधारणा, अपेक्षेपेक्षा चांगली आलेली कंपन्यांची आकडेवारी तसेच युरोपीय बाजारात झालेल्या रिकव्हरीने यामध्ये मोठे योगदान दिले. यामुळे बाजारात सकारात्मकता परत येण्यास मदत झाली.

आतापर्यंत कंपन्यांची तिमाही आकडेवारी चांगली आली असून ही आश्चर्यकारक बाब आहे. निर्देशांकाशी संबंध असलेल्या प्रमुख कंपन्यांची आकडेवारी सादर झाली आहे. त्यामुळे खराब काळ निघून गेला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वास्तविक ही तेजी मर्यादेत राहिली. या आठवड्यात अमेरिका आणि जपानमध्ये केंद्रीय बँकांची पतधोरण आढावा बैठक होणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सतर्कता दिसून आली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीवर सर्व अवलंबून राहणार आहेत. या बैठकीमध्ये व्याजदरात बदल करण्यात येणार नसल्याचे मानले जात आहे. पुढील काळात बाजारात सकारात्मक धारणेसह मर्यादेतच व्यवहार होण्याची शक्यता आहे. नकारात्मक बातमी येण्याची शक्यता नसल्याने सकारात्मक धारणा कायम राहील. व्यावसायिकांचे कंपन्यांच्या उत्पन्नावर बारीक लक्ष राहणार आहे. कंपन्यांच्या विशेष शेअरमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. भारताच्या राजकोशीय घाट्याची आकडेवारी जाहीर होणार आहे. यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहे याचा अंदाज येईल. यातही नकारात्मक आकडेवारी अाल्यास बाजाराच्या धारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जागतिक पातळीवर विचार केल्यास त्यात काही विशेष होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत बाजाराला उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील पीएमआय डेटा जाहीर होईपर्यंत थांबावे लागणार आहे. ही आकडेवारी सोमवारी जाहीर होणार असून यामुळे आर्थिक हालचाली तेजीने होण्याची अपेक्षा कमीच आहे. मात्र, चीनमध्ये असलेल्या स्थिरतेमुळे जागतिक बाजारात तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीवर नजर राहील. यात कोणत्याही पद्धतीने वाढ झाल्यास शेअर बाजारात तेजी दिसण्याची शक्यता आहे.

तांत्रिकदृष्ट्या बाजार ८,००० च्या वर जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र ते सोपे नाही. बुधवारी निफ्टीला ७९७८ अंकांच्या जवळ रेझिस्टन्स मिळण्याची शक्यता असून घसरणीत याला ७९४८ अंकांच्या जवळ आधार मिळेल. या पातळीवरून निफ्टी खाली किंवा वर गेल्यास त्याला धारणा मानावी. अशा स्थितीत निफ्टीत ४३ अंकांचा चढउतार दिसून येऊ शकतो. जर िनफ्टीने ७९७८ अंकांची रेझिस्टन्स पातळी पार केली तर त्याला पुढचा प्रमुख रेझिस्टन्स ८०५९ अंकांच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या निफ्टीसाठी हा चांगला रेेझिस्टन्स सिद्ध होऊ शकतो. निफ्टी या पातळीच्या वर गेल्यास त्याचा पुढचा प्रमुख रेझिस्टन्स ८२२५ अंकांच्या जवळ मिळेल. घसरणीचा विचार केल्यास िनफ्टीला पहिला अाधार ७९४८ अंकांच्या जवळपास मिळेल. ही पातळी याच्या सध्याच्या बंदच्या खूपच जवळ आहे. बाजारात चांगल्या व्हॉल्यूमसह घसरणीचा दबाव बनला तर निफ्टी ७९२१ अंक खाली येऊ शकतो. ही एक महत्त्वपूर्ण आधार पातळी असेल. मात्र, व्हॉल्यूमसह विक्रीचा मारा झाला तर त्यात स्थिरता राहणार नाही. याला पुढचा प्रमुख अाधार ७९७७ अंकांच्या जवळपास मिळेल. निफ्टीला पुढचा प्रमुख आधार ७७७४ अंकांच्या जवळपास मिळेल.

शेअरमध्ये आयसीआयसीआय बँक आणि सोभा लिमिटेड चांगल्या स्थितीत दिसत आहेत. आयसीआयसीआय बँकेचा सध्याचा बंद भाव २५४.०५ रुपये असून तो २६० रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला २४९ रुपयांवर स्टाॅप लॉस लावावा. तर सोभा लिमिटेडचा सध्याचा बंद भाव २९७.७५ रुपये, त्यात ३०३ रुपयांपर्यंतची वाढ मिळू शकते. त्याला २९० रुपयांवर स्टॉप लॉस लावावा.
(लेखक- तांत्रिक विश्लेषक moneyvistas.comचे सीईओ आहेत.)
(vipul.verma@dbcorp.in)