आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्याजदर कपातीची आशा, सेन्सेक्सची ४०८ अंकांनी वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करण्याच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. त्यामुळेच बाजारात नव्या उत्साहाने व्याजदर संवेदनशील समभागांची खरेदी झाली. त्यामुळे गेल्या चार आठवड्यांतील घसरणीला लगाम बसून सेन्सेक्स ४०८ अंकांनी, तर निफ्टी १३४ अंकांनी झेपावला.

अपुर्‍या पावसाची चिंता, भांडवल बाजारातून सातत्याने बाहेर जात असलेला निधी, रुपयाचे अवमूल्यन यामुळे सेन्सेक्सचा चढता आलेख कायम राहण्यात काहीशी अडचण आली; पण चीन सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेत स्थिरता येण्याची चिन्हे दिसू लागली आहे, त्यामुळेही बाजाराला माेठा आधार मिळाला.

मंगळवारी सेन्सेक्स २५,३०२,९८ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. पण चीन अर्थव्यवस्थेच्या िचंतेने सेन्सेक्स गेल्या १५ महिन्यांत पहिल्यांदाच २५ हजार अंकांच्या खाली म्हणजे २४,८३३.५४ अंकांच्या पातळीवर आला. पण नंतरच्या सत्रांमध्ये रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याची आशा बाजाराला वाटू लागली आहे, त्यामुळे बाजारात व्याजदर संवेदनशील आणि वित्तीय समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. खरेदीच्या पाठबळामुळे साप्ताहिक आधारावर सेन्सेक्समध्ये २५,८७५. ९६ अंकांची सुधारणा झाली. दिवस अखेर सेन्सेक्स ४०८.३१ अंकांनी वाढून २५,६१०.२१ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

गेल्या चार आठवड्यांत सेन्सेक्सने ३०३४.४९ अंकांची गटांगळी खाल्ली होती. निफ्टीदेखील घसरून ७५३९.५० अशा तेरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता; पण नंतर त्यात सुधारणा झाली. साप्ताहिक आधारावर निफ्टीमध्ये १३४.२५ अंकांची वाढ होऊन तो ७७८९.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला. कररचनेत सुसूत्रता आणण्यासाठी कर सवलती काढून टाकण्याचा विचार आहे. सवलत काढून टाकण्यात येणार्‍या करांची यादी काही दिवसांत जाहीर करणार असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. उद्याेग, बँक अधिकारी आणि अर्थतज्ज्ञांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेमध्ये करावयाच्या उपाययाेजनांबाबत चर्चा झाली. त्यामुळेही या आठवड्यामध्ये बाजाराला माेठा दिलासा मिळाला.

हे समभाग घसरले : हिंदुस्तान युनिलिव्हर, काेल इंिडया, लुपिन, डाॅ. रेड्डीज, सनफार्मा, आयटीसी.