Home | Business | Share Market | Wheat farmers should be imposed on the import duty to get a good price

शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी यासाठी गव्हावर पुन्हा आयात शुल्क लावण्याची शक्यता

वृत्तसंस्था | Update - Mar 24, 2017, 05:49 AM IST

यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी यासाठी गव्हावर पुन्हा आयात शुल्क लावण्याचा विचार सरकार करत आहे. उद्योग संघटना असोचेमच्या एका कार्यक्रमात कृषी सचिव शोभन के. पटनायक यांनी बुधवारी ही माहिती दिली.

 • Wheat farmers should be imposed on the import duty to get a good price
   नवी दिल्ली - यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी यासाठी गव्हावर पुन्हा आयात शुल्क लावण्याचा विचार सरकार करत आहे. उद्योग संघटना असोचेमच्या एका कार्यक्रमात कृषी सचिव शोभन के. पटनायक यांनी बुधवारी ही माहिती दिली. गव्हावर आयात शुल्क लावण्यात यावे किंवा नाही यावर मंत्रालय विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  
   
  ची आयात सुरू झाली आहे. इतर काही गहू उत्पादक राज्यांमध्येही गहू येण्यास आता सुरुवात होणार आहे. नवीन गहू बाजारात आल्यानंतर गव्हाच्या किमतीवर दबाव वाढून किमती कमी होण्याची शक्यता आहे. सरकारने आठ डिसेंबर रोजी गहू आयात शुल्क रद्द केले होते. त्याआधी १० टक्के आयात शुल्क होते.
   
  भारतीय बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी तसेच किरकोळ बाजारात गव्हाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. गव्हाच्या किमतीविषयी प्रश्न विचारल्यानंतर कृषी सचिवांनी सांगितले की,  एफसीआय किमान हमी भावाने गव्हाची खरेदी करणार आहे.
   
  ९.६६ कोटी टन विक्रमी उत्पादन  
  चालू पीक वर्ष २०१६-१७ (जुलै ते जून) दरम्यान गव्हाचे विक्रमी ९.६६४ कोटी टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच या आधीच्या वर्षी झालेल्या ९.२२९ कोटी टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ४.७१ टक्के जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्या आधीच्या पीक वर्षात म्हणजेच २०१३-१४ मध्येही गव्हाचे ९.५८५ कोटी टन विक्रमी उत्पादन झाले होते.  

Trending