आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाऊक महागाई दर नीचांकी पातळीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील महागाई कमी होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई दर नीचांकी पातळीवर गेला असून हा दर ३.७८ टक्क्यांवर आला आहे. जून महिन्यात घाऊक महागाई दर सर्वात उच्चांकी पातळीवर ५.४ टक्क्यांवर गेला होता. तर औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचा दरदेखील महिन्यातील सर्वोच्च स्थानी ३.८ टक्क्यांवर गेला
आहे. मे महिन्यात हा आकडा २.७ टक्के होता. तसे पाहिले तर गेल्या वर्षी या औद्योगिक क्षेत्रातील वाढीचा दर ४.३ टक्के होता. यामध्ये उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तूंनी दिलासा दिला आहे.

फळे, भाज्या झाल्या स्वस्त
जुलै महिन्यात फळे आणि भाजीपाला स्वस्त झाला आहे. या क्षेत्रात महागाई दर अनुक्रमे १.४ आणि ७.९ टक्के नोंदवण्यात आले आहे. जूनमध्ये तो ३.५१ टक्के आणि ५.३७ टक्के होता. इतर वस्तूंमध्ये दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा महागाई दर ६.१२ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या महिन्यात तो ७.१८ टक्के होता. याचप्रमाणे मांस, मासे यांच्या िकमतीतही काही प्रमाणात बदल झाला आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या किमतीतदेखील थोड्या प्रमाणात घट झाली आहे.

जून महिन्यात उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने या क्षेत्रात मेच्या तुलनेत वाढ झाली आहे. जून २०१५ मध्ये उत्पादनातील वाढ ४.६ टक्के नोंदवण्यात आली. हाच आकडा मे २०१५ मध्ये २.२ टक्के होता.