आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- तुमच्या घराचा पत्ता आता अक्षरांमध्ये नव्हे तर सहा आकड्यांमध्ये राहील. त्यामुळे कुणाला पत्ता सांगताना केवळ मोबाईल क्रमांकासारखा हा क्रमांक सांगावा लागेल. त्यातून तुम्ही कोणत्या शहरात राहाता, एरिया कोणता, रस्ता कोणता, घराचा क्रमांक कोणता आदी माहिती लगेत उपलब्ध होईल. यासारखी मोदी सरकार आणखी एक आधारकारर्ड आणणार आहे. मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
अॅड्रेसचा आधार
या योजने अंतर्गत तुमच्या अॅडरेसच्या जागी सहा आकडी क्रमांक अलॉट केला जाईल. या कोडचे नाव ईलॉक असे असेल. याचा फायदा हा असेल की कुणालाही हा क्रमांक सांगितला तर ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या घराच्या मॅपसह सगळी माहिती क्षणात उपलब्ध होईल. यासाठी मॅप माय इंडियाने मॅप माय इंडिया ईलॉक तयार केले आहे.
पर्यटक, पाहुण्यांना अशी होईल मदत
एखाद्या जागेच्या अॅडरेसचा ईलॉक माहिती करुन घेतल्यावर तुमच्या समोर त्या जागी जायचे कसे याची माहिती मॅपसह सादर होईल. त्यामुळे एखाद्या पर्यटकाला समजा गेट वे ऑफ इंडियाला जायचे आहे तर त्याने केवळ वेबसाईटवर ईलॉक टाकावे लागेल. तसेच तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही लगेच तुमचे घर सापडेल. त्यासाठी वारंवार तुम्हाला फोन करण्याची गरज भासणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, भविष्यात असे कामाचे असेल ईलॉक....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.