आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Rate Cut By RBI In May Is Likely,but Not A Done Deal: Nomura

मेमध्ये कर्ज स्वस्त होण्याची चिन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) येत्या तीन मे रोजी वार्षिक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. या आढाव्यात आरबीआयकडून रेपो दरात 0.25 टक्के कपातीची 80 टक्के शक्यता असल्याचा अंदाज नोमुरा या गुंतवणूकदार बँकेने व्यक्त केला. रेपो दरातील ही कपात निश्चित आहे असे मात्र कोणी समजू नये ,असेही नोमुराने म्हटले आहे.


नोमुराने जाहीर केलेल्या अहवालानुसार आर्थिक विकासाच्या मंदावलेल्या चक्राला गती देण्यासाठी व महागाई दरात झालेल्या घसरणीमुळे आरबीआय रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. मात्र, हे निश्चित ठरले आहे असे मात्र नाही. दीर्घ कालावधीनंतर आरबीआयकडून रेपो दरात 0.25 टक्के कपात होण्याची 80 टक्के शक्यता आहे.


घाऊक महागाई दरात मार्चमध्ये मोठी घसरण होऊन महागाई 5.96 टक्के या पातळीवर आली. याशिवाय सोन्यासह अनेक कमोडिटीच्या किमतींतील घसरण भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देणारी आहे. यामुळे घाऊक महागाई दरावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. आगामी काळात तेल तसेच सोने आयातीवर होणारा खर्च कमी होणार आहे.