आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aakash 4 To Have Calling Facility, 4G Services Support

4-जी, कॉलिंगच्‍या सुविधेसह लवकरच येणार 'आकाश-4'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आकाश' या सर्वात स्वस्‍त टॅबलेटची नवी आवृत्ती लवकरच येणार आहे. 'आकाश-4' हा नवा टॅबलेट राहणार आहे. त्‍यात आधुनिक फिचर्स देण्‍यात येणार आहेत. ही फिचर्स पाहता 'आकाश-4' यशस्‍वी ठरण्‍याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने 'आकाश-4' ची माहिती आणि फिचर्स जाहीर केली. त्‍यानुसार, त्‍यात '4-जी' इंटरनेटचा सपोर्ट राहणार आहे. डोंगलच्या सहाय्याने '4 जी' सेवेचा वापर करता येऊ शकेल. याशिवाय 'आकाश-4'वर 2-जी आणि 3-जी सेवाही वापरता येऊ शकेल. आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे, आधुनिक फिचर्समुळे त्‍यात कॉल करण्‍याचीही सुविधा राहणार आहे. या टॅबलेटची किंमत जाहीर करण्‍यात आलेली नाही.

'आकाश' प्रकल्‍प ही तत्‍कालीन मनुष्‍यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांची कल्‍पना होती. जगातील सर्वात स्‍वस्‍त टॅबलेट म्‍हणून 'आकाश'ची प्रसिद्धी करण्‍यात आली होती. हा प्रकल्‍प 5 ऑक्टोबर 2011 रोजी लॉंच करण्‍यात आला होता. सुरुवातीच्‍या टॅबलेटमध्‍ये अतिशय प्राथमिक फिचर्स होते. 'आकाश'च्या पहिल्या आवृत्तीची किंमत 2276 रुपये होती. त्यानंतरच्या आवृत्तीत काही फीचर्सची वाढविण्‍यात आले होते. परंतु, किंमत तितकीच ठेवण्यात आली होती. त्‍यानंतर 'आकाश'ची निर्मिती करणारी डाटाविंड कंपनीचा सरकारसोबत वाद निर्माण झाला होता. आयआयटी मुंबईने त्‍यात काही तांत्रिक त्रुटी सांगितल्‍या होत्‍या. आता 'आकाश-4' सादर होणार आहे. त्‍यात ब्लूटूथसह अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीच्‍या आवृत्तीमध्‍ये हे फिचर नव्‍हते.