आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटच्या भवितव्याचा आज होणार फैसला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर 'आकाश'च्या भवितव्याविषयी एखादा मोठा निर्णय आज घेतला जाण्याची शक्यता आहे. या टॅबलेटची निर्मिती करणारी इंग्लंडची कंपनी डेटाविंडचे अधिकारी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अधिकारी यांच्यात आज बैठक होणार आहे. या बैठकीत आयआयटी जोधपूरचे प्राध्यापकही सहभागी होतील.
'आकाश'विषयी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तक्रारी आल्या होत्या. कंपनीने जुनी आवृत्ती बंद करून नवी आवृत्ती आणण्याची घोषणा केली. आयआयटी जोधपूरने आकाश टॅबलेटविषयी प्रतिकूल मत दिले होते. या टॅबलेटमध्ये काही दम नाही. तो लवकर गरम होतो, असे आयआयटी जोधपूरच्या तज्ज्ञांनी म्हटले होते. यानंतर सरकारने चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
केंद्राने 'आकाश' प्रकल्‍पच रद्द केला आहे. आता सरकार पूर्णपणे भारतात तयार झालेल्‍या टॅबलेटसाठी निविदा काढणार आहे. या प्रकल्‍पासाठी आयआयटी जोधपूरला कंत्राट देण्‍यात आले होते. आयआयटीकडे 1 लाख टॅबलेट तपासण्‍याची तसेच तांत्रिक सहकार्याची जबाबदारी होती. डाटाविडला कंत्राट मिळाल्‍यानंतर आयआयटीने तांत्रिक अटींमध्‍ये बदल केला. त्‍यामुळे वादाची ठिणगी पडली. आयआयटीने सुचविलेले बदल 35 अमेरिकन डॉलर्स एवढ्या किंमतीमध्‍येच समाविष्‍ट करण्‍यात येतील, असे डाटाविंडने सांगितले होते. परंतु, कंपनीने 'आकाश'चा पुरवठा केला, त्‍यावेळी आयआयटीने त्‍यास फेटाळले. यावर डाटाविंडने खुलासा करताना सांगितले की, आयआयटीने जे बदल सुचविले होते ते खराब हवामानामध्‍ये सैन्‍याच्‍या वापरात येणा-या टॅबलेटमध्‍ये वापरण्‍यात येतात.
'आकाश' प्रकल्‍प रद्द, नावाच्‍या व्‍यावसायिक वापरावरही बंदी
'आकाश' टॅबलेटसाठी ऍप बनविणार्‍याला मिळणार एक लाख रुपये
आकाश कॉम्प्युटर खरेदीसाठी प्रचंड गर्दी