आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने दिले 3 लाख रुपये कारच्या लकी नंबरसाठी; पाहा, मि. परफेक्शनिस्टचे कार कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Bentley Continental कारमध्ये आमिर खान)
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानला जीवनात प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि क्लासिक हवी असते. यापूर्वी आमिर 2011 मध्ये लक्झरी कार Rolls Royce Ghost लिकत घेताना चर्चेत आला होता. स्टार्ससाठी महागड्या गाड्या विकत घेणे सामान्य बाब आहे. मात्र आमिरने 1.22 कोटींची ही कार 3.11 कोटी रुपयांना विकत घेतली होती.
युके वरून मागवण्यात आलेल्या या कारचा क्रमांक MH 11 AX
आमिरने 1 हा व्हीआयपी क्रमांक मिळवण्यासाठी 3 लाख रुपये खर्च केले होते. याशिवाय त्याने 45.57 लाख रुपयांचा RTO ला टॅक्स आणि 1.41 लाख रुपयाची कस्टम ड्यूटीही दिली होती. मॅटेलिक सिल्व्हर रंगाची ही कार एका दुसर्‍या पत्त्यावर मागवण्यात आली होती.

आमिरचे लक्झरी कार कलेक्शन
Rolls Royce Ghost शिवाय आमिरकडे Bentley Continental ही सुध्दा एक महत्त्वाची कार आहे. या कारचा नंबर 0007 असा आहे. त्याचबरोबर मि. परफेक्शनिस्टकडे BMW 5, BMW 6, रेंज रोवर एसयूव्ही, मर्सडीज बेंज S600, टोयोटो फॉर्च्यूनर, लेक्सस, ऑडी Q-7 यांसारख्या लक्झरी कार आहेत.

जाणून घ्या आमिरच्या लाईफ स्टाईल बद्दल काही खास -

- आमिर मुंबईच्या ब्रांद्रा येथील बेला विस्टा अपार्टमेंटमध्ये राहतो. आमिरचा हा फ्लॅट 5 हजार स्क्वेअर फीट एवढा विस्तृत आहे.

- याशिवाय मुंबईमध्ये आमिरच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. यात एक 3 बीएचके फ्लॅट याशिवाय पाचगणीमध्ये 8 कोटी किंमतीचे एक फार्म हाऊस आहे.

- आमिर टीव्ही शो मधील सर्वात महागडे अभिनेता आहे. सत्यमेव जयते च्या एका भागासाठी त्याने 3 कोटी रुपये घेतले होते.

- आमिरचा आवडते हॉलिडे ड़ेस्टीनेशन लंडन आहे.

- आमिरला जने गाणे ऐकायला, क्रीकेट खेळायला आवडते. त्याशिवाय तो टेनिसही खेळतो.

- मुघलाई आणि बेक्ड चिकन त्यांची फेव्हरेट डिश आहे.

- आमिर एकेकाळी चेन स्मोकर होता. या गोष्टीचा खुलासा त्याने त्याच्या एका मुलाखतीत केला. एकावेळी तो जवळपास 40 सिगरेट ओढायचा.

- आमिर बॉलीवुडमधील एकुलता एक अभिनेता आहे जो अवॉर्ड कार्यक्रमात जात नाही. तसेच विनाकारण तो माध्यमांशी बोलत नाही.

- आमिरने लंडनमधील मॅडम तुसाद वॅक्स म्यूझिअम मध्ये स्वतःचा पुतळा उभारण्यासही नकार दिला.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, आमिरचे लक्झरी कार कलेक्शन...
नोट : ‘स्टार्स ऑन व्हील’ या स्पेशल सिरीजमध्ये आम्ही आज तुम्हाला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लक्झरी कार कलेक्शनबद्दल सांगणार आहोत. तसेच त्यांच्या लाइफस्टाईल विषयीही काही खास गोष्टी बद्दलही तुम्हाला माहिती देणार आहोत. आम्ही या सिरिज अंतर्गत तुम्हाला सेलेब्रिटीजच्या कार, बाईक्स आणि प्रायव्हेट जेट कलेक्शनबद्दल माहिती देतो.