आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Above Five Lakhs Tax Payers Should Fill Up E Filing ; Cleared By Finance Minister

5 लाख उत्पन्नावरील प्रत्येकास ‘ई-फायलिंग’अनिवार्य ; वित्त मंत्रालयाचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणा-या करदात्यांना आपले कर विवरणपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अर्थात ‘ई-फायलिंग’ करणे आवश्यक राहणार असल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संपत्ती कर परतावा भरण्याच्या दृष्टीनेही वित्त मंत्रालय ‘ई- फायलिंग’मध्ये तरतूद करणार आहे.

कर निर्धारण अधिकारी आणि करदाते यांच्यातील दरी भरून काढण्याच्या दृष्टीने ‘ई-फायलिंग’सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या गटातील सर्वांना त्यांचा प्राप्तिकर परतावा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावा लागेल, असे महसूल सचिव सुमीत बोस यांनी ‘फिक्की’च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

मागील वर्षी सरकारने 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र ‘ई- फायलिंग’ स्वरूपात सादर करण्याची पद्धत सुरू केली होती.

संपत्ती करावर नजर
*प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139 सी आणि 139 डीनुसार काही ठरावीक वर्गातील करपात्र व्यक्तींसाठी उत्पन्नाचे विवरणपत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
*प्राप्तिकर खाते कर आधार वाढवण्याचे कसून प्रयत्न करीत असून विवरणपत्र न सादर करणा-या पॅन कार्डधारकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बोस यांनी या वेळी दिली.
*संपत्ती कर कायद्याच्या कलम 14 नुसार निर्धारित अर्जातील मूल्यांकन तारखेच्या दिवशी निव्वळ संपत्तीबाबतचे विवरणपत्र सादर करायचे असते. सध्या संपत्ती कर नियमातील तरतुदींतर्गत निव्वळ संपत्तीचे विवरणपत्र सादर करताना काही दस्तऐवज आणि अहवाल द्यावे लागतात.