* अॅकॉर्ड दीर्घ काळापासून कारप्रेमींच्या आवडीची कार म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी ही कार अधिक स्मार्ट व नव्या रूपात लाँच होणार आहे. कारचा लूक फ्रेश आहे. एकाच नजरेत लाइन्स व फॉर्म लक्षात येणार नाहीत. मात्र, छोटे बदल महत्त्वाचे आहेत. कारचे पूर्वीचे मॉडेल जास्त मोठे होते. मात्र, नवे मॉडेल अधिक स्मार्ट व लक्षवेधी आहे.
* यातील इंटेरिअर जास्त ऐसपैस आहे. याचा लक्झरी टच लगेच जाणवतो. डिझाइनमध्ये
होंडा व अॅकॉर्ड दोन्ही कंपन्यांचा ठसा लक्षात येतो.
* कारची समोरची बाजू (नोज) जास्त कॉम्पॅक्ट आहे. कारलाच कॉम्पॅक्ट लूक देण्यात आलाय. चेसिस जास्त रिजिड आहे. कारला शार्प करण्यात आले आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवे ४० टक्के जास्त स्टीफ आहे.
* कारमध्ये आकर्षक फीचर्स आहेत. मल्टी व्ह्यू रिव्हर्सिंग कॅमेरा, मागे बसणा-यांसाठी रुंद लॉगरूम सुविधा. जास्त वेळ प्रवास केल्यास अवघडल्यासारखे होत नाही. सीआरव्हीसारखे लेयर्ड डायल दिले आहेत.
* प्रथमदर्शनी यातील बारकावे लक्षात येत नाहीत. मात्र, कार इम्प्रेसिव्ह आहे. रहदारी जास्त असली तरी कार आरामदायी ठरते. चालकास फार ताण पडत नाही. याची २.४ लिटर मोटर मजबूत आहे. बूटस्पेस रुंद आहे. मात्र, यात केवळ ३८७ लिटर सामान ठेवता येते.
* रस्त्यावर एखादा ब्लाइंड स्पॉट असेल तर चालकाला पूर्वसूचना देण्यासाठी लेनवॉचद्वारे कॅमे-याचा वापर करता येतो. ग्रिलवर क्रोमचा रुंद बँड असल्याने वेगळा लूक मिळतो.