आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत आता खाते उघडण्याची प्रक्रिया झाली सुलभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -केवायसी अर्थात नो युवर कस्टमर प्रक्रिया सामायिक बनवण्याच्या दृष्‍टीने भांडवल बाजार नियंत्रक सेबीने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. मध्यवर्ती केवायसी नोंदणी संस्थेकडे अर्ज करताना गुंतवणूकदारांना उत्पन्न आणि व्यवसाय याचा तपशील न देता आपले खाते अधिक सुलभपणे उघडता येऊ शकणार आहे. बाजार नियंत्रक ‘सेबी’ने एका अध्यादेशाच्या माध्यमातून केवायसी अर्जामध्ये आवश्यक तो बदल घडवून आणण्यासाठी भांडवल बाजारातील विविध मध्यस्थांना सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.

सेबीच्या मध्यवर्ती केवायसी नोंदणी संस्थेकडे अर्ज करताना ढोबळ वार्षिक उत्पन्नाचा तपशील, व्यवसाय, कायम स्वरूपी राहण्याचा पत्ता वा अर्जदार राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे वा नाही यासारखी माहिती देण्याची गरज नाही. भांडवल बाजारातील विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एकूणच वित्तीय क्षेत्रासाठी एकसमान केवायसी प्रक्रिया तयार करणे सुसह्य होऊ शकणार आहे. ‘केआरए’ ही संस्था गुंतवणूकदारांच्या केवायसी तपशिलाचे व्यवस्थापन करते. शेअर बाजाराच्या स्वत:च्या मालकीच्या उपकंपन्या आणि डिपॉझिटरी हे केआरए म्हणून कार्यरत राहण्यासाठी पात्र असतात. केआरए प्रणाली मध्यवर्ती झाल्यामुळे गुंतवणूकदारांना खाते उघडताना केवळ एकदाच केवायसी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. याचा अर्थ हा गुंतवणूकदाराने नंतर भांडवल बाजारातील अन्य विविध मध्यस्थांशी जरी संपर्क साधला तरी त्याला पुन्हा केवायसी प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही.
एकच केवायसकेवायसी
या अगोदर भांडवल बाजार नियंत्रकांनी खाते उघडण्यासाठी एक प्रमाणित अर्ज तयार केला होता. हा अर्ज दोन विभागांमध्ये होता. यातील पहिल्या भागात गुंतवणूकदारांच्या मूळ केवायसी तपशिलाचा समावेश असायचा आणि तो सेबीकडे नोंदणी झालेल्या सर्व मध्यस्थांकडून वापरला जायचा. दुसºया भागात या मध्यस्थांच्या विशिष्ट कामकाज क्षेत्राबाबत अतिरिक्त माहिती समाविष्‍ट केली जायची.