Home | Business | Gadget | aci launches low-cost icon 1100 'laptop', at rs. 4999 ‎

स्वस्त अन् मस्त ! 5 हजारांत हाय रिझोल्यूशन लॅपटॉप

वृत्तसंस्था | Update - Jun 27, 2012, 11:13 PM IST

टॅब्लेटच्या स्पर्धेने जोर धरला असताना इंग्लंडस्थित एसीआय कंपनीने बुधवारी मुंबईत अवघ्या 4,999 रुपयांत आयकॉन -1100 हा ‘फुली फंक्शनल’ लॅपटॉप सादर केला.

 • aci launches low-cost icon 1100 'laptop', at rs. 4999 ‎

  मुंबई - टॅब्लेटच्या स्पर्धेने जोर धरला असताना इंग्लंडस्थित एसीआय कंपनीने बुधवारी मुंबईत अवघ्या 4,999 रुपयांत आयकॉन -1100 हा ‘फुली फंक्शनल’ लॅपटॉप सादर केला. विशेष म्हणजे या लॅपटॉपमध्ये हाय रिझोल्यूशन स्क्रीन असून इतर महागड्या लॅपटॉपच्या सर्व सुविधा त्यात आहेत.
  बीएसईमध्ये नोंदणीकृत असलेल्या अलाइड कॉम्प्युटर्स इंटरनॅशनल (आशिया) कंपनीकडून या लॅपटॉपचे भारतात मार्केटिंग होणार आहे. एसीआयची भारतीय शाखा अलाइड कॉम्प्युटर्स इंटरनॅशनल (आशिया) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिरजी पटेल म्हणाले की, आम्ही भारताचा पहिला सर्वात कमी किमत असलेला आयकॉन -1100 हा लॅपटॉप 4,999 रुपयांत सादर करत आहोत. किंमत कमी असली तरी इतर कोणत्याही लॅपटॉपसारख्या या लॅपटॉपमध्येही पूर्ण सुविधा असतील. विंडोज कॉम्पॅक्टिबल असलेला हा लॅपटॉप भारतात आतापर्यंतचा सर्वात स्वस्त संगणक आहे.
  पहिल्या वर्षात कंपनीचे भारतात दोन लाख लॅपटॉप विक्रीचे उद्दीष्ट आहे. एसीआय इंडिया भारतात कल्पक डिझाइन आणि सुविधा असलेले लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची विक्री करते. स्वस्त लॅपटॉप प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबद्दल पटेल म्हणाले, कंपनी चीनमधून उत्पादने आयात करून भारतीय ग्राहकांना अत्यंत कमी नफ्यावर त्यांची विक्री करणार आहे.
  उत्पादनांची किंमत कमी असली तरी दर्जाबाबत आम्ही कोणताही समझोता करणार नाही. इंग्लंड आणि भारतातील आधीच्या मॉडेलच्या प्रतिसादाचा अनुभव लक्षात घेता उत्पादनांची नवी श्रेणी ही अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आली आहे. भारतात दरवर्षी 25 लाख लॉपटॉपची विक्री होते. मात्र इंग्लंड आणि युरोपसह इतर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे 10 टक्केच आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी विद्यार्थ्यांना स्वस्त दरांत लॅपटॉप देण्याची घोषणा केली आहे. एसीआयच्या स्वस्त लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यी व सर्वसामान्यांच्या हाती परवण्याजोग्या किमतीत लॅपटॉप येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
  कधी मिळणार - आयकॉन 1100 चे व्यावसायिक लाँचिंग जुलैमध्ये होणार आहे. ऑगस्टपर्यंत बाजारपेठेत तो सादर करण्यात येईल.
  आकाश-2 रेडी - जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट असा लौकिक मिळवलेलल्या आकाश टॅब्लेटची दुसरी सुधारित अद्ययावत वेगवान आवृत्ती बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
  आयकॉनची वैशिष्ट्ये
  सीपीयू - व्हीआयए प्रोसेसेर
  डिस्ले - 10.2 इंच एलईडी
  रॅम - 512 एमबी, 1.0 जीबीपर्यंत एक्स्पँडेबल
  स्टोरेज - 4 जीबी, 64 जीबीपर्यंत एक्स्पँडेबेल
  साऊंड - हाय डेफिनिशन साऊंड
  यूएसबी - 3 यूएसबी पोर्ट (2.0 व्हर्जन)
  कनेक्शन - 10/100 इथरनेट अ‍ॅडाप्टर
  वायरलेस अ‍ॅडाप्टर
  थ्री जी रेडी (पर्यायी)
  कार्ड रीडर - 1 पुश कार्ड रिडर
  मल्टिमीडिया मेमरी कार्ड/एसडी कार्ड
  वेब कॅमेरा - व्हीजीए वेब कॅम
  वजन - 0.7 किलो बॅटरीसह

Trending