सध्या सण-उत्सवाचा काळ आहे. घराला नवा लूक देणाऱ्या सजावटीच्या अनेक वस्तू व साधने सध्या बाजारात आली आहेत. यासोबत या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी बरीच गॅजेटसही आली आहेत. याशिवाय जाणून घ्या बीएमडब्ल्यूच्या नव्या अॅक्टिव्ह हायब्रीड ७ एल कारमध्ये खास आहे तरी काय?
* पेट्रोल कारची मागणी भारतात कमी असून हायब्रीड कार घेण्यास सहसा ग्राहक धजावत नाहीत, तरीही बीएमडब्ल्यूच्या ७-सिरीजमधील अॅक्टिव्ह हायब्रीड ७ एलचे लाँचिंग करण्यात आले आहे.
* या कारमध्ये ३१५ बीएचपी व ३ लिटर स्ट्रेट सिक्स पेट्रोल इंजिनसोबतच ५५ बीएचपीची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. यामुळे कारची एकूण क्षमता ३५० बीएचपी होते. वास्तवात अॅक्सिलरेटर जास्त असेल, तरच दोन्ही इंजिन काम करतात.
* यातील इलेक्ट्रिक मोटारची कन्सेप्ट ७४० एलआय मॉडेलकडून घेण्यात आलीय. या मॉडेलचे सध्या उत्पादन होत नाही. ७४० एलआयला १०० किमीचा वेग घेण्यास ५.९ सेकंद लागत होते. मात्र, यापेक्षाही कमी वेळात अॅक्टिव्ह हायब्रीड ७ ताशी १०० किमीच्या वेगाने धावते.
* इलेक्ट्रिक इंजिन जास्त वाहतुकीच्या रस्त्यांसाठी अधिक उपयुक्त. कमी वेगात ही कार सलग ४ किमीचे अंतर इलेक्ट्रिक मोडमध्ये कापते. मुख्य इंजिन बंद असल्याने प्रदूषण नाही. इंजिनचाही आवाज येत नाही.
* कारला इलेक्ट्रिक मोडमध्ये चालवताना ताशी ६० किमी हा कमाल वेग आहे. अॅक्सिलरेटरवर जास्त दबाव पडल्यास पेट्रोल इंजिन सुरू होते.
* कारचे पेट्रोल इंजिनही जबरदस्त आहे. त्यामुळे स्पोर्टस कारचा फील येतो. हे इंजिन इलेक्ट्रिक मोटारच्या लिथियम आयर्न बॅटरीला चार्ज करते.
* ट्रॅफिक जाममध्ये कार बंद असेल, तरीही याची बॅटरी एअरकंडिशनिंग सिस्टिमला बंद पडू देत नाही. मात्र, बॅटरीला ठेवण्यासाठी जास्त जागा खर्ची पडली आहे.
* कारच्या ऑटो इंजिन स्टार्ट -स्टॉप सिस्टिमला कोणत्याही परिस्थितीत बंद करता येत नाही. हे सातत्याने सुरू असते.
* इतर बाबतींत अॅक्टिव्ह हायब्रीड ७ ही या सिरीजच्या इतर कारप्रमाणेच आहे. यात ८- स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स लावण्यात आलाय. स्पोर्टी लूक, एलईडी हेडलँप, आरामदायी मागची सीट ही कारची वैशिष्ट्ये आहेत.
* ७ सिरीजच्या इतर कार भारतातील रस्त्यांसाठी परवडणा-या नाहीत. अॅक्टिव्ह हायब्रीड ७ मध्येही भारतीय रस्त्यांसाठी काही खास फीचर्स नाहीत.
* कारचे हायब्रीड इंजिन आणि दमदार परफॉर्मंस हीच कारची खासियत आहे. मात्र, १.३५ कोटी रुपये ही कारची किंमत जास्त आहे. ७३० डी कारच्या तुलनेत या कारचे फीचर्स विशेष नसल्याचे कंपनीनेही मान्य केले आहे.
किंमत : ~ 1.35 कोटी
(एक्स शोरूम, दिल्ली)
जमेच्या बाजू
> दमदार पेट्रोल इंजिन
> नवे फीचर्स, स्पोर्टस कारचा फील
उणिवा
> किंमत कोटीच्या घरात
> इलेक्ट्रिक मोटारची कमी रेंज
आपली गाडी नेमक्या कोणत्या मोडवर आहे हे या ग्राफिक्सच्या माध्यमातून कळते.
बॅटरीसाठी बूट स्पेसमधूनच जागा घेण्यात आली आहे. यासाठी जागा जास्त लागली आहे.
यातील इको-प्रो फीचर इलेक्ट्रिक -ऑनली रेंजला वाढवण्यास सक्षम आहे.