आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adani Groups Coal Mine And Port Project In Australia

अदानी ग्रुप ऑस्ट्रेलियात:वर्षाला 6 कोटी टन कोळसा निर्मिती, 10 हजार नोकर्‍या मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण पूर्व आशिया दौर्‍यावर आहेत. 15 नोव्हेंबरला ते ऑस्ट्रेलियात पोहोचतील. पंतप्रधान मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अदाणी ग्रुपचा महत्त्वाकाक्षी 'ऑस्ट्रेलियन कोल माइन' प्रोजेक्ट दोन्ही देशांमधील चर्चेतील प्रमुख मुद्दा बनण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट यांनी गौतम अदाणी यांच्या 'ऑस्ट्रेलियन कोल माइन' प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. टोन‍ी एबोट गेल्या महिन्यात भारत भेटीला आले होते.
'अदानी ग्रुप'ने वर्ष 2010 मध्ये मध्य क्विन्सलेन्डमधील गेलिलि बेझिनमध्ये 'ग्रीन फील्ड कार्माइकल कोल माइन' आणि उत्तर क्विन्सलेन्डमधील बोवेनजवळ असलेल्या एबोट पॉइंन्ट पोर्ट खरेदी केले होते. कार्माइकल माइनमधून न‍िघणारा कोळसा रेल्वे मार्गाने एबोट पॉइंट पोर्टपर्यंत पोहोचवून तो विविध देशात निर्यात करण्याची योजना अदाणी ग्रुपने आखली आहे.

अदानी ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रोजेक्ट कार्माइकल माइन प्रोडेक्टचाच एक भाग आहे. या प्रोजेक्टमुळे सुमारे दहा हजार नोकर्‍या उपलब्ध करून द‍िल्या जाणार आहे. तसेच प्रोजेक्टमुळे ऑस्ट्रेलियाच्या औद्योगिक विकासात मोठी भर पडणार असून भारतातील अनेक गावांमध्ये वीज पोहोचणार आहे.

भारतात वीज निर्मिती क्षेत्रात विकास साधण्यासाठी कोळशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. देशातील कोळसा उत्पादनात मोठी घट झाली आहे. याप्रमाणात घटल्याने अन्य देशातून कोळसा आयात करावा लागत आहे. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियातील अदानी यांच्या कोल माइन प्रोजेक्टमधून कोळसा आयात केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अदानी ग्रुपच्या 'ग्रीन फील्ड कार्माइकल कोल माइन'ची छायाचित्रे...