आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adhil Shetty Article About Personal Loan,, Divya Marathi

कोणत्या गरजापूर्तींसाठी घ्यावे पर्सनल लोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राकेश सिन्हा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. त्यांचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. शहरात मोक्याच्या जागी 10 लाख रुपयांपर्यंतची जागा घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, त्यासाठी तीन लाख रुपये कमी पडताहेत. ही अडचण ते राकेश याच्या कानावर घालतात. त्यावर राकेश वडिलांना सांगतो की, व्यवहाराची चर्चा सुरू ठेवा, तोपर्यंत तीन लाख रुपयांची सोय करतो. राकेश यांचे वार्षिक वेतनमान आठ लाख रुपये आहे. बँकेकडून तीन लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळेल, अशी माहिती राकेशला मिळते. ते 10,2000 रुपयांच्या मासिक हप्त्याने (ईएमआय) तीन वर्षांसाठी तीन लाखांचे वैयेक्तिक कर्ज (पर्सनल लोन) घेतात.

अगदी वेळेवर वडिलांच्या मदतीला आल्यामुळे राकेश खुश आहेत. याउलट परिस्थिती संजयकुमार यांची आहे. त्यांची मोठी शस्त्रक्रिया होणार आहे, त्यांचा विमा नाही. त्यांची मुलगी एका मोठ्या कार निर्माता कंपनीत कार्यरत आहे. ती चार लाखांचे पर्सनल लोन घेऊन तत्काळ रकमेची व्यवस्था करते.

अशा परिस्थितीत पर्सनल लोन घेणे योग्य मानले जाते. बँका कर्ज रकमेच्या परतफेडीच्या क्षमतेवर लक्ष ठेवतात, ती कशासाठी वापरली जाते त्यावर नाही, हे लक्षात ठेवा.

लोक का निवडतात हा पर्याय : पर्सनल लोन घेणारे या रकमेचा वापर कसा करतात यासाठी बँक बाजार डॉट कॉमने एक सर्वेक्षण केले, त्यात आढळलेल्या प्रमुख बाबी अशा :
- कौटुंबिक अडचण : वर उल्लेख केलेल्या उदाहरणाप्रमाणे बहुतेक जण आपल्या कुटुंबाच्या तातडीच्या गरजापूर्तीसाठी पर्सनल लोन घेतात. सुमारे 37 टक्के लोकांनी ही बाब मान्य केली.
- देणे फेडण्यासाठी : नातेवाईक किंवा मित्रांकडून घेतलेले पैसे फेडण्यासाठी सुमारे 10 टक्के लोकांनी वैयक्तिक कर्जाचा आधार घेतला. काही जणांनी क्रेडिट कार्डवरील देणे फेडण्यासाठी असे कर्ज घेतले. कारण क्रेडिट कार्डवरील व्याजदर जास्त असू शकतात.
- घरगुती साहित्य खरेदीसाठी : टीव्ही, फ्रीज, एसी आदी घरगुती उपकरण खरेदीसाठी काही जण अशा स्वरूपाचे कर्ज घेतात. अशा वस्तू खरेदीमुळे मासिक बजेटवर परिणाम होईल, असे दिसल्यास या खरेदीसाठी पर्सनल लोन घेतले जाते. घरगुती साहित्य खरेदीसाठी अशा स्वरूपाचे कर्ज घेतल्याचे सहा टक्के लोकांनी मान्य केले.
- सुटीतील पर्यटन : सुमारे पाच टक्के लोकांनी सुटीतील पर्यटनासाठी (हॉलीडे ट्रॅव्हल) पर्सनल लोनचा आधार घेतला. ज्यांच्याकडे अस्थायी स्वरूपात तत्काळ पैशांची सोय नाही अशा लोकांनी या कर्जाचा पर्याय स्वीकारल्याचे सिद्ध झाले आहे.
- विवाह, मोठ्या समारंभासाठी : विवाह सोहळा किंवा कुटुंबातील मोठ्या समारंभासाठी वैयक्तिक कर्ज घेतल्याचे सुमारे 17 टक्के लोकांनी मान्य केले.
- गृहकर्जाच्या डाउनपेमेंटसाठी : काही जण गृहकर्जाच्या डाउनपेमेंटसाठी वैयक्तिक कर्जाचा आधार घेतात हेही या वेळी समोर आले. सुमारे 15 टक्के लोकांनी या कारणासाठी पर्सनल लोन घेतल्याचे उघड झाले.
- पात्रता काय : बँकेच्या दृष्टीने कर्ज घेणारे दोन प्रकारचे असतात. ज्यांना कर्ज देण्यात जोखीम जास्त असते, त्यांच्याकडून बँक तारण म्हणून घर, जमीन, शेअर्स, सोने आदी घेऊन नंतर कर्ज मंजूर करतात आणि दुसरे म्हणजे ज्यांना कर्ज देण्यात जोखीम कमी असते. असे लोक असुरक्षित कर्जास पात्र असतात.
नोकरी करणार्‍यांना कर्ज देण्यात जोखीम कमी असते. त्यामुळे त्यांना पर्सनल लोन लगेत मिळू शकते. मात्र, ज्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही त्यांना अशा स्वरूपाचे कर्ज मिळणे अवघड ठरते.