आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्ज स्विच करताना सतर्कता हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृह कर्ज घेणारे नेहमीच कमी व्याजदरात कर्ज देणा-या बँकांच्या शोधात असतात. मग गृहकर्जाचे व्याजदर वाढोत किंवा घटोत, त्यांना त्याचे काहीएक देणे नसते, तर सध्याचे गृहकर्जदार आपले कर्ज दुस-या बँकेत वळवण्याच्या (स्विच) शक्यतांचा विचार करतात. मात्र, कमी व्याजदरावर गृहकर्ज स्विच करणे लाभदायी आहे का? यात कारणे किंवा उद्देश यांची भूमिका महत्त्वाची असते. दीर्घकालावधीसाठी हा पर्याय खर्चात भर टाकू शकतो किंवा खर्च वाचवू शकतो. दीर्घकालावधीसाठी विचार केल्यास आणि सर्व बाबीवर लक्ष दिल्यास खाली दिलेली माहिती उपयुक्त ठरू शकते...
० खर्चाचा अंदाज घ्या : गृहकर्ज दुस-या बँकेत स्विच ओव्हर करताना पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क भरावे लागते. फ्लोटिंग व्याजदराच्या गृहकर्जावरील प्रीपेमेंट शुल्क माफ करण्यात आले असले, तरी फिक्स्ड व्याजदराच्या गृहकर्जावर हे शुल्क लागू आहे.
नवी बँकेच्या व्याज दरवाढीकडे लक्ष द्या : सध्याच्या बँकेची व्याजदरवाढ झाल्यास लगेच गृहकर्ज दुस-या बँकेत स्विच ओव्हर करू नये. दुसरी बँकही व्याजदरातच वाढ करण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दुस-या बँकेचे व्याजदर पहिल्या बँकेपेक्षा जास्त असू शकतात. विविध बँकांच्या व्याजदराचा कल आपल्याला विविध अर्थविषयक संकेतस्थळावर मिळू शकतो.
०दुस-या बँकेची मंजुरीही आवश्यक : वर नमूद सर्व बाबीचा विचार करूनही होमलोन स्विच करायचे असेल तर तसा अर्ज दुस-या बँकेकडे द्यावा लागतो. काही कारणांमुळे ती बँक अर्ज नाकारू शकते, ती कारणे अशी :
१घराचे बांधकाम सुरू असेल आणि प्रकल्पाला मंजुरी नसेल तर- सध्याच्या गृहकर्जाचे हप्ते नियमित भरले नसतील तर - घराचे बांधकाम रखडले असेल तर- कर्जाचा मोठा हिस्सा भरला असेल आणि कर्ज देण्यात बँकेला फायदा नसेल तर- कर्जावरील व्याजाचा बहुतांश हिस्सा भरला असेल आणि मुद्दलाचा मोठा हिस्सा बाकी असेल तर तर कर्ज स्विच करण्यात जास्त बचत साधणार नाही. अशा वेळी संभाव्य बचतीचा तुलनात्मक अभ्यास करा. त्यानंतर मूळ बँकेतच कर्ज ठेवण्याचा पर्यायही योग्य ठरू शकतो.
०गृहकर्ज ट्रान्सफरची प्रक्रिया : गृहकर्ज बदलण्याच्या प्रक्रियेसाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. काही खासगी बँका यासाठी वैयक्तिक संपर्क साधतात, तर इतर बँकांत यासाठी खूप चकरा माराव्या लागतात. सर्वसाधरणपणे गृहकर्ज बदलण्याची प्रक्रिया अशी असते :
१ सध्याची बँक कर्जधारकाला एक कंन्सेट पत्र किंवा एनओसी देते. त्यावर कर्जफेडीच्या रकमेचा उल्लेख असतो. - ही कागदपत्रे नव्या बँकेला द्यावी लागतात. -याच्या आधारावर नवी बँक कर्जाची रक्कम जुन्या बँकेसाठी मंजूर करते आणि जुनी बँक कर्जधारकाचे खाते बंद करते.- त्यानंतर घराची कागदपत्रे नव्या बँकेकडे दिली जातात, अशा प्रकारे जुन्या बँकेसाठी कर्जाच्या उर्वरित रक्कम रद्द होते. - बहुतेक बँका फ्लोटिंग दराच्या कर्जावर प्रीपेमेंट पेनॉल्टी आकारत नाहीत. मात्र स्थिर व्याजदराच्या कर्जावर ही पेनॉल्टी द्यावी लागते. मुद्दलाच्या 2 ते 5 टक्के इतकी ही पेनॉल्टी असू शकते. तसेच बँक काही शुल्क पेनॉल्टीच्या स्वरूपातही आकारते.
गृहकर्ज स्विच करण्यासाठी सर्व मंजु-या घ्याव्या लागतात. यात घराचे कायदेशीर व्हेरीफिकेशन, क्रेडिट प्रपोजल आणि नव्या बँकेचे तांत्रिक मूल्यांकन आदींचा समावेश असतो. गृहकर्ज घेतल्यानंतरच्या प्रारंभीच्या काळात अशा प्रकारचे कर्ज स्विच करणे जास्त फायदेशीर ठरते.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.