आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावश्यक खरेदी टाळून यंदा करा कर्जमुक्तीचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवे वर्ष अनेक क्षेत्रांतील नव्या वाटचालींची नांदी ठरते. आर्थिक नियोजनाचाही यात समावेश आहे. आपले आर्थिक नियोजन उत्तम आणि शिस्तबद्ध असावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, खूपच कमी व्यक्तींना हे साध्य होते. असे का? कर्जाच्या जाळ्यात अडकणे हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे. कोणत्याही व्यक्तीची आर्थिक क्षमता गडप करण्याची कर्जाची सवय असते. कर्ज जेवढे जास्त असेल तेवढे व्याज जास्त लागेल. वेगवेगळ्या कर्जावर व्याज लागते तशी आर्थिक स्थिती नाजूक होत जाते. नवे वर्ष सुरू झाले आहे. जुन्या कर्जातून मुक्तीचा आता संकल्प सोडूया, तसेच आगामी काळात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या योजनेवर काम करूया..
अविवेकी शॉपिंग टाळा
प्रतिबंध हाच संरक्षणाचा सर्वात मोठा उपाय आहे, अशा अर्थाची एक म्हण आहे. भविष्यात कर्जापासून दूर राहायचे असेल तर न विचार करता खरेदी टाळा. तुम्हाला खरेदीची सवय आहे का ? अनावश्यक वस्तूंची खरेदी करता का? असे असेल तर खर्च कमी करून बचत वाढवण्यावर भर द्यायला हवा. आर्थिक अनिश्चिततेच्या आणि जागतिक मंदीच्या या काळात एक रुपया वाचवणे हे एक रुपया कमावण्यासारखे आहे. आवश्यक वस्तूंची खरेदी टाळणे म्हणजे कर्च कमी करणे नव्हे. मात्र, दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी स्वत:वर नियंत्रण ठेवा.
जुने कर्ज फेडा : कर्ज कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे जुने कर्ज फेडणे. समजा तुमच्याकडे शिलकीचा पैसा असेल तर तो कुठे तरी खर्च करण्यापेक्षा जुने कर्ज फेडा. ज्या कर्जावर जास्त व्याज असेल ते कर्ज प्राधान्याने फेडा. म्हणजे क्रेडिट कार्ड विल, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज हे त्यांच्या व्याजदरानुसार लवकरात लवकर फेडा. वार्षिक बोनस, पर्क्‍स आणि इतर फायद्यांचा वापर कर्ज फेडण्यासाठी करा. होम लोनच्या बाबत जेथे वाजवी व्याजदर असतील तेथे हे कर्ज ट्रान्सफर करा. हे पाऊल बचत वाढवणारे राहील.
अनावश्यक कार्ड बंद करा : सध्या अनेक जणांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असते. यामुळे अनावश्यक खर्चाची शक्यता वाढीस लागते. क्रेडिट कार्ड जेवढे जास्त असतील तेवढे व्याजफेडीची मुदत न राखण्याचे प्रमाण वाढीस लागते. क्रेडिट कार्डच्या रकमांवर चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज लागू असते, त्यामुळे ती रक्कम वाढत जाते. क्रेडिट कार्ड असणे फायदेशीर असले तरी एकापेक्षा जास्त कार्ड असल्यास कर्जाच्या जाळ्यात गुंतण्याची शक्यता जास्त असते, हे लक्षात ठेवा.
उत्पन्नातील मोठा हिस्सा गुंतवा : जुने कर्ज फेडणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच उत्पन्नातील मोठय़ा रकमेचा आपत्कालीन फंड तयार करणे आवश्यक असते. जुने कर्ज फेडण्यासाठी हा फंड कामी येऊ शकतो. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. बचत ही एक चांगली सवयदेखील आहे. ती विकसित करणे गरजेचे आहे. यातून प्रत्येक जण आपले आणि आपल्या मुलांचे भवितव्य चांगले घडवू शकतो.
कर्ज सल्लागार नेमा : कर्ज खूप असेल तर त्यासाठी सल्लागाराची गरज लागेल. सल्लागार आपल्या गरजांनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्हाला चांगले पर्याय सांगेल. सल्लागाराची फी देण्यात अडचण असेल तर मोफत सल्लागाराकडे जा. सध्या अनेक बँका तसेच बँकेतर वित्तीय पुरवठा कंपन्यांनी आर्थिक साक्षरता सल्ला केंद्रे उघडली आहेत. त्यात कर्जविषयक मोफत सल्ला मिळतो.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com