आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगाऊ तिकीट खरेदी करा, अन् स्वस्तात विमान भरारी घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रवाशांना स्वस्त विमान सफर घडवण्याची स्पर्धा अद्याप संपलेली नाही. आता या स्पर्धेत भरारी घेत जेट एअरवेजने विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सात लाख तिकिटे स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही विक्री आठवडाभर चालणार आहे. प्रवाशांना दहा ऑगस्टनंतर याचा फायदा घेऊन स्वस्त आणि मस्त विमानोड्डाण करता येणार आहे.

जेट एअरवेजच्या या नव्या ‘ऑफर’नुसार 750 किमी, 750 ते 1000 किमी आणि एक हजार कि.मी पेक्षा जास्त अंतरासाठी इकॉनॉमी वर्गातून प्रवास करण्यासाठी अनुक्रमे 1,777 रु,, 2,777 रु आणि 3,777 रुपये असे एकमार्गी भाडे द्यावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तिकिटाच्या खर्चामध्ये इंधन अधिभाराचा समावेश असला तरी प्रवाशांना केवळ लागू असलेला कर भरावा लागणार आहे. हा स्वस्त प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना 9 ऑगस्टपूर्वी तिकिटांचे आरक्षण करावे लागेल. या सात दिवस अगोदर आरक्षित केलेल्या तिकिटावर विमान प्रवास दहा ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर करावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे हे तिकीट रिफंडेबल नसेल आणि प्रवासाच्या तारखेत बदल केल्यास विद्यमान पद्धतीनुसार 1200 रुपये (प्रतिक्षेत्र) शुल्क आकारण्याची परवानगी आहे. आर्थिक चणचणीच्या खराब हवामानात भारतीय विमान उद्योग घिरट्या घालत आहे. परंतु तरीही गेल्या काही महिन्यांपासून स्वस्तात स्वस्त विमानसेवा घडवण्याची स्पर्धा अजूनही कायम आहे. आता त्यात स्पाइस जेटची यंदा भर पडली असून अन्य विमान कंपन्याही याच मार्गाने उड्डाण करतील असा अंदाज या क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केला. जेटने स्वस्त विमान सफर घडवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे अबुधाबी येथील एतिहाद एअरवेजबरोबरच भांडवल विक्री करार झाल्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे संकेत असल्याचे मतही हवाई उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जेट-एतिहाद व्यवहाराला अद्याप मंजुरी मिळालेली नसली तरी जेटने फेब्रुवारी महिन्यात भांडवली हिस्सा विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नवी ऑफर अशी
० जेट एअरवेजच्या या नव्या ‘ऑफर’ नुसार 750 किमी, 750 ते 1000 किमी आणि एक हजार कि.मी पेक्षा जास्त अंतरासाठी इकॉनॉमी वर्गातून प्रवास करण्यासाठी अनुक्रमे 1,777 रु,, 2,777 रु आणि 3,777 रुपये असे एकमार्गी भाडे.

० तिकिटाच्या खर्चामध्ये इंधन अधिभाराचा समावेश असला तरी प्रवाशांना केवळ लागू असलेला कर भरावा लागणार आहे.

० स्वस्त प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना 9 ऑगस्टपूर्वी तिकिटांचे आरक्षण करावे लागेल.