आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने चुकीच्या पद्धतीने प्रसारीत केल्या जाणा-या 87 कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. एएससीआयला अशा प्रकारच्या जाहिरातींबाबत एकूण 108 तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आश्चर्यकारक बाब म्हणजे यापैकी 40 टक्के तक्रारी एकट्या शैक्षणिक क्षेत्राच्या जाहिरातींच्या होत्या.
एएससीआयच्या मते शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आरोग्य आणि पर्सनल केअर कॅटेगरीच्या जाहिरातींबाबतच्या तक्रारींचा आकडाही मोठा आहे. ज्या प्रमुख कंपन्यांच्या विरोधात तक्रारी मिळाल्या त्यामध्ये रॅनबॅक्सी, जॉन्सन बेबी सोप, गार्लिक प्लस, प्रॉक्टर अँड गॅम्बलचे वेल्ला कलर्स, कॅडबरी चॉक्लेयर्स, डाबर चे फेम ब्लीच, बजाज इलेक्ट्रॉनिक्सचे सीएफएल बल्ब, डॉ. बत्रा यांचे होमिओपॅथी क्लिनिक आणि इमामी सोना-चांदी च्यवनप्राश यांचा समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रानंतर पर्सनल केअर आणि हेल्थकेअर कॅटेगरीच्या 35 टक्के तक्रारी मिळाल्या. 2013 च्या दरम्यान एएससीआयला ज्या तक्रारी मिळाल्या होत्या त्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत पाच पटींनी वाढल्या आहेत.
2013 मध्ये एकूण 1842 तक्रारी मिळाल्या होत्या त्यापैकी 1477 तक्रारींवर कारवाई करून संबंधित कंपन्यांच्या जाहिराती थांबवण्यात आल्या होत्या. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या एका जाहिरातीत, स्कूटरवरून तिघे तेही हेल्मेट न घातला जाताना दाखवले होते, त्या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे. हेल्थ व पर्सनल केअरमध्ये 65 जाहिरातींच्या विरोधात तक्रारी मिळाल्या होत्या. त्यात प्रामुख्याने द बॉडी केअर स्लिमिंग अँड ब्यूटी क्लिनिक, युरेनक्सी हेल्थकेअर, देवी आयुर्वेदिक, हिंदुस्तान रिसर्च हेल्थ प्रॉडक्ट, इंडिया अॅडव्हान्स हेअर यांचा समावेश आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील तक्रारी
शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्थांच्या विरोधात प्रामुख्याने तक्रारी मिळाल्या होत्या, त्यामध्ये अनुराग अग्रवाल इन्स्टिट्यूट, सॅफरन अॅड्युवर्ल्ड, आयआयईएमएस, जीत कॉन्सेप्च्युअल क्लासेस, बीएससी अकॅडमी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग यांचा समावेश आहे. तर कंझ्युमर ड्युरेबलमध्ये बजाज इलेक्ट्रॉनिक्स, फूड अँड बेव्हरेजेसमध्ये ऑर्गेनिक लिव्हिंग, स्टार व्हिजन यलो स्टार ज्यूस, कॅडबरी इंडिया, जीवन संचय, विमल पान मसाला व हल्दिराम फूड्स इंटरनॅशनल यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.