आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 8 Aprill 2014 95 Percent Of The Atm May Get Hacked News In Marathi

CYBER THREAT : 8 एप्रिलनंतर 95 टक्के ATM हॅक होण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुढील एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये जगातील अर्ध्याहून अधिक एटीएम आणि त्याही पेक्षा मोठ्या संख्येने कॉम्प्यूटरवर निर्भर असलेल्या इंडस्ट्रीयल कंट्रोल सिस्टिम हॅक करणे हॅकरला सोपे होणार आहे. जगातील 95 टक्क्यांहून अधिक एटीएम हे विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. मायक्रोसॉफ्टचा विंडोज एक्सपीचा सपोर्ट संपल्यानंतर हॅकरचे पहिले टार्गेट एटीएम मशिन्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 95 टक्के एटीएममध्ये हॅकिंग किंवा व्हायरसचा धोका वाढणार आहे.

2001 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट देणे सुरु केले होते, ते आता 8 एप्रिलपासून बंद करणार आहेत. असे असतानाही अजूनही अनेक कंपन्या याच ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करीत आहेत. कारण नवीन सिस्टीम अपग्रेडेशनसाठी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षीत आहे. तो वाचवण्यासाठी जूनीच सिस्टीम चालू ठेवील जात आहे.

सिस्टीम अपग्रेडेशनमध्ये होत असलेला हा उशिरच हॅकरच्या पथ्यावर पडण्याची शक्याता आहे. सिक्युरिटी एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, मायक्रोसॉफ्ट विंडोज त्यांच्या विंडोज 7, विंडोज 8 आणि विंडोज व्हिस्टा यासाठी सपोर्ट सुरु ठेवणार आहे. यांचा वापर करुन एक्सपीच्या कमतरता शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे हॅकर्स विंडोज एक्सपीवर हल्ला करतील.

सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये कॉम्प्यूटर सिक्यूरिटीबद्दल आयोजित एका परिषदेमध्ये मायक्रोसॉफ्टचे संचालक टिमोथी रेन्स म्हणाले, विंडोज 7, विंडोज 8 आणि विंडोज व्हिस्टाच्या सिक्यूरिटी अपडेट्सचा वापर करुन विंडोज एक्सपीवर हल्ला करणे 100 टक्के शक्य आहे.

सिक्यूरिटी एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार जगामध्ये कॉम्प्यूटरची संख्या आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संकटाचा सर्वाधिक तोटा गरीब देशांना होणार आहे.

वास्तविक, सपोर्ट बंद झाल्यानंतरही ज्यांना गरज असेल ते एक्सपीचा वापर करु शकतात मात्र कंपनी त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अपडेट देणार नाही. जर तुमच्या कॉम्प्यूटरवर एखादा व्हायरस अॅटॅक झाला किंवा ते कोणी हॅक केले तर त्याची संपूर्ण जबाबदारी युजर्सची असणार आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कंपनीने असा निर्णय का घेतला....