आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावानंतर मोबाइल फोन कंपन्यांना पुरेसे स्पेक्ट्रम उपलब्ध होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेब्रुवारीमध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव होणार असून त्यातून ८० हजार कोटींची रक्कम प्राप्त होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. लिलावानंतर मोबाइल फोन कंपन्यांना पुरेसे स्पेक्ट्रम उपलब्ध होतील, अशी माहिती दूरसंचार व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. संरक्षण विभागासोबत स्पेक्ट्रम सोडण्याबाबतचा वाद मिटला आहे. त्याबाबत गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यात सरकारला यश आले आहे,
असे ते म्हणाले.

लष्कराला दुसरे स्पेक्ट्रम देणार : थ्री जी सेवा सुरू करण्यासाठी २१०० मेगाहर्टज फ्रिक्वेन्सीचे स्पेक्ट्रम पुरेसे समजले जाते. या मेगाहर्टजचे स्पेक्ट्रम सध्या लष्कराकडे आहे. ते त्यांच्याकडून परत घेऊन त्यांना दुस-या फ्रिक्वेन्सीचे स्पेक्ट्रम देण्याचा प्रस्ताव असून त्यावर सहमती झाली आहे. स्पेक्ट्रम उपलब्धता ठरवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व काही
सरकार करेल.

सरकार पुढील महिन्यात टू जी व थ्री जी स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. त्याच्या विक्रीतून सरकारला जवळपास ८० हजार कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारीमध्ये होणा-या लिलावाच्या वेळी थ्री जी स्पेक्ट्रम पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणे गरजेचे आहे. सध्या १७ सर्कलमध्ये केवळ ५-५ मेगाहर्टज थ्री जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची चर्चा आहे. कमी स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यास किमती अनावश्यक वाढतील, असा इशारा दूरसंचार नियामक राहुल खुल्लर यांनी दिला आहे. एअरटेल व व्होडाफोनसह अनेक ऑपरेटर्सची परवान्यांची विविध सर्कलमधील मुदत या वर्षी संपत आहे. त्यांना सेवा पुढे सुरू ठेवण्यासाठी पुन्हा स्पेक्ट्रम खरेदी करावे लागतील.
लिलाव प्रक्रिया पारदर्शकरीत्या पूर्ण केली जाईल. ग्रामीण भागाला ब्रॉडबँडने जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या "डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी स्पेक्ट्रम पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.