आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Election Economical Cycle Take Speed,Moody's Expressed Estimation

निवडणुकांच्या निकालावर ठरणार अर्थचक्राची गती, मुडीजने व्यक्त केला अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवीन वर्षाच्या दुस-या सहामाहीत देशातील आर्थिक सुधारणांचा वेग मंदावण्याची शक्यता असली तरी लोकसभा निडणूक निकालांचा आर्थिक वाढीच्या संधीवर परिणाम होऊ शकतो, असे मत मुडीज या जागतिक पतमानांकन संस्थेने व्यक्त केले आहे.
विशेष करून भारताचा उल्लेख करताना मुडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील सार्वभौम मानांकन यंदाच्या वर्षात स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागतिक वृद्धीच्या संधींमध्ये सुधारणा होऊन जागतिक जोखमीचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली आहे. यंदाच्या दुस-या सहामाहीमध्ये देशातील आर्थिक सुधारणांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. परंतु लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा आर्थिक वाढीवर परिणाम होईल. मानसिकता व धोरणांचा परिणाम कसा होतो त्यावर ते अवलंबून असेल असे मत मुडीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष टॉम बायर्न यांनी व्यक्त केले.
कर्ज स्वस्त होणार
० या वर्षभरात महागाईबरोबरच व्याजदरही घसरण्याचा अंदाज व्यक्त करूनही मुडीजने आणखी दिलासा दिला आहे. मुडीजने देशाच्या पतमानांकनाला ‘बीएए 3’ असा स्थिर पतदर्जा दिला आहे. परंतु वित्तीय तूट मात्र सर्वाधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
० जागतिक मागणीतील सुधारणा आणि गुंतवणुकीत वाढ अपेक्षित धरता यंदाच्या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत सहा टक्के आणि 2016-17 वर्षात ती 7.1 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.