नवी दिल्ली- 'Flipkart' आणि 'snapdeal' या आघाडीच्या दोन ई कॉमर्स वेबसाइट्सनी मेगा ऑफर्स देऊन भारतीय ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला. flipkart चा 'बिग बिलियन डे' ऑफर्सला ग्राहकांकडून तुफानी प्रतिसाद मिळाला. परंतु, ग्राहकांची मोठी झुंबड आल्याने वेबसाइट काही वेळातच 'क्रॅश' झाली. ग्राहकांची नाराजी दूर करण्यासाठी flipkart पुन्हा एक धमाका ऑफर देणार आहे.
'flipkart'च्या या मेगासेलमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंवर मोठी सवलतच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 'बिग बिलियन डे'ची देशभरात व्यापक प्रमाणात जाहिरातही करण्यात आली होती. परंतु, सेल सुरू झाल्यानंतरच काही तासांतच वेबसाइट क्रॅश झाल्याने ग्राहकांची मोठी निराशा झाली होती. गेल्या आठवड्यात ई-कॉमर्सतील हलचालीवर संपूर्ण देशाचे लक्ष होते.
चायनीज अॅपलचे एक लाख फोन विक्री करणार flipkartचायनीज अॅपल म्हणून प्रचलित असलेला 'xiaomi रेडमी-1 एस'
स्मार्टफोनचे एक लाख सेट्स विक्री करण्याचा flipkart ने संकल्प केला आहे. खास दिवाली धमाका सेलमध्ये 'xiaomi रेडमी-1'ची जोरात विक्री सुरु आहे. 'xiaomi रेडमी-1एस'चे तीन लाख पेक्षा जास्त
मोबाइल विकले गेल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. xiaomi रेडमी-1 एसच्या आणखी दोन लाख मोबाइलची प्री बुकींग झाली आहे.
'xiaomi एमआय-3' नंतर 'xiaomi रेडमी-1 एस' हा स्वस्त स्मार्टफोन आहे. याची किमत 5999 रूपये आहे.