आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Reserve Bank Decision Income Tax Department Strict Eye On Notes Before 2005

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर प्राप्तिकर खात्याची 2005 पूर्वीच्या नोटांवर करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन नुकतेच केले. नोटा बदलून घेण्याच्या या प्रक्रियेवर प्राप्तिकर खात्याची पाळत राहील, या अदलाबदलीत मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्राप्तिकर खाते सजग झाले असून खात्याची गुन्हे शोध शाखा आता रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बँकांतही नोटा बदलण्याची फारशी हालचाल दिसत नाही. एक एप्रिल ते जूनपर्यंत 2005 पूर्वीच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची गरज नसल्याचे रिझर्व्ह बँकेने या पूर्वीच स्पष्ट केले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिका-याच्या मते, नोटा अदलाबदलीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर पाळत ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग नवे धोरण आखत आहे. या काळात मोठ्या प्रमाणात होणा-या नोटा अदलाबदलीवर पाळत ठेवण्यात येणार आहे. सध्यातरी या संदर्भात रिझर्व्ह बँक आणि प्राप्तिकर विभाग यांच्यात चर्चा झालेली नाही. मात्र, खात्याला गरज भासल्यास याबाबत रिझर्व्ह बँकेला लेखी कळवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काळा पैसा खपवता येणार
अशा प्रकाराच्या नोटा अदलाबदलीत काळ्या पैशाची प्रकरणे तपासणे अवघड आहे. कारण एक एप्रिल ते 30 जूनपर्यंत बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची गरज भासणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते सोने किंवा रिअल इस्टेटमध्ये तो सहज गुंतवू शकतात. मात्र, आय अँड सीआयकडे अशा प्रकारचे व्यवहार तपासण्याचे तंत्र आहे. त्यांच्याकडे 2006 पासून ते आजवरच्या पॅनधारकांच्या खात्यांची पूर्ण माहिती एका क्लिकद्वारे मिळू शकते.