आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Second Term Booming Came; Sensex 19 Points, Nifty Increases

दोन सत्रांनंतर आली तेजी; सेन्सेक्समध्ये 19 अंकांनी, तर निफ्टीत किरकोळ वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँकेने व्याज दरवाढीचा धक्का दिल्यानंतर घसरणीच्या वाटेवर असलेल्या बाजारात दोन सत्रांनंतर मंगळवारी तेजी परतली. सेन्सेक्स 19.52 अंकांच्या वाढीसह 19,920.21 वर बंद झाला. निफ्टीने 2.7 अंकांच्या किरकोळ वाढीसह 5,892.45 ही पातळी गाठली. डेरिव्हेटिव्ह सौदापूर्तीमुळे गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली.


सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 14 समभागांत तेजी आली. अमेरिकेतील शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे आशियातील प्रमुख बाजारांत घसरण दिसून आली. चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे बाजार घसरणीसह बंद झाले. युरोपातील बाजारात प्रारंभीच्या सत्रात तेजीचे वातावरण होते.


देशातील बाजारात बजाज ऑटोने तेजीचे नेतृत्व केले. टाटा पॉवर, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आणि एचडीएफसीच्या समभागांची चांगली खरेदी झाली. तर हिंदाल्को, कोल इंडिया, जिंदाल स्टील, भारती एअरटेल आणि विप्रोच्या समभागांना विक्रीचा फटका बसला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 80.57 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.