आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The Worst Show In 12 Years, Indian IPOs Are Poised For A Comeback

बजेटनंतर आयपीओत संधी; गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी मोठा वाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी अर्थसंकल्पानंतर बाजारात प्राथमिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) आणण्याची तयारी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. मागील दोन वर्षे सुस्त पडलेल्या आयपीओ बाजारात आता उत्साह दिसून येत असून त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या नव्या संधी मिळणार आहेत. वाजवी दरात विमान प्रवास घडवणारी कंपनी म्हणून ख्याती असणार्‍या इंडिगोने बाजारातील सध्याची तेजी लक्षात घेऊन आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्याची तयारी पूर्ण केली आहे. याशिवाय हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडची चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत आयपीओ आणण्याची योजना आहे. सेबीच्या नव्या नियमामुळे अनेक सरकारी कंपन्यांचे एफपीओ येण्याची शक्यता आहे.

आयपीओ बाजारातील दुष्काळ संपला
दोन वर्षांपासून आयपीओ बाजारात दुष्काळ पडला होता. मागील दीड वर्षात केवळ चार कंपन्यांचे आयपीओ आले. बर्‍याच वर्षांनंतर आता आयपीओ क्षेत्रात हालचाल दिसत आहे. एचएएलचा आयपीओ सादर झाला, तर एप्रिल 2012 नंतर सादर होणारा तो सरकारी कंपनीचा पहिलाच आयपीओ राहील. यापूर्वी एप्रिल 2012 मध्ये एनबीसीसी या सरकारी कंपनीचा आयपीओ आला होता. आगामी काळात आयपीओंची लाट राहणार आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे? :
केजरीवाल यांच्या मते, ज्या कंपन्यांची मूलभूत स्थिती उत्तम आहे अशा कंपन्यांच्या आयपीओचे योग्य मूल्यांकन करून त्यात गुंतवणूक करावी. जे आयपीओ अत्यंत महागड्या दराचे आहेत त्यांच्या वाटेला जाऊ नका. कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या स्थितीनुसार गुंतवणूक करा.

वंड्रेला हॉलिडेजने दिला भरभरून परतावा
यंदा 9 मे 2014 रोजी लिस्ट झालेल्या वंड्रेला हॉलिडेजने आतापर्यंत 60 % परतावा देत गुंतवणूकदारांना खुश केले आहे. याचा दर 125 रुपये होता आणि बीएसईवर 27 जून रोजी हा समभाग 199.45 रुपयांवर बंद झाला. मागील 18 महिन्यांत लिस्ट झालेल्या चारही कंपन्यांच्या आयपीओने लिस्टिंगनंतर भरभरून परतावा दिला आहे.

निवडक आयपीओने रिटर्नही दिला आहे
केजरीवाल यांच्या मते, मागील काही काळापासून आयपीओ बाजाराचा कल बदलला आहे. मागील दीड वर्षात निवडक आयपीओ आले. चांगला कारभार असणार्‍या कंपनीने उचित मूल्यांकनासह आयपीओ आणले, तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो, हे या कंपन्यांनी दाखवून दिले आहे. बाजारातील सद्य:स्थिती पाहता आगामी काळात आयपीओ चमकदार कामगिरी करू शकतात.
(डेमो पिक)