आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर एशियाची मार्च- एप्रिलपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एअर एशियाची भारतातील विमानसेवा पुढील दोन - तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता कंपनीचे प्रमुख टॉनी फर्नांडिस यांनी दाव्होस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना व्यक्त केली. विमानसेवा जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विमान तिकिटांचे दर सगळ्यात स्वस्त असण्याचे संकेतही त्यांनी दिले.
एअर एशिया इंडिया विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज असून केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी लवकरच मिळण्याची शक्यता असल्याचे यंदाच्या मार्च- एप्रिलपासून विमानसेवा सुरू होण्याचा अंदाज फर्नांडिस यांनी या वेळी व्यक्त केला.