आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

990 रुपयांत करा \'एअर एशिया\'तून प्रवास; स्पाइस जेटच्या दरातही कपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एअर एशिया'ची स्वस्त हवाई सेवा सुरु होण्याच्या आधीत घरगुती एअर लाइन्स कंपन्यामध्ये पुन्हा एकदा तिकिट दरावरून स्पर्धा जुंपली आहे. 'एअर एशिया'ने काही निवडक मार्गावर रेल्वेच्या तिकिट दरापेक्षाही कमी तिकिट दरात हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे. उल्लेखनिय म्हणजे, बंगळुरुमधील यशवंतपूर ते गोवा रेल्वेचे थर्ड एसीचे तिकिट दर 1110 रुपये आहे. मात्र, 'एअर एशिया'तर्फे बंगळुरु ते गोवासाठी फक्त 990 रुपये आकारले जात आहेत.
12 जूनपासून बंगळुरु-गोवा मार्गावर आली पहिली हवाई सेवा सुरु करत असल्याचे 'एअर एशिया'ने आज (शुक्रवार) जाहीर केले. सर्व करांसह 990 रुपये तिकिट दर ठेवण्यात आला आहे. एअर एशियाची आजपासून तिकिट विक्री सुरु करण्‍यात येणार आहे. 12 जूनला पहिले ए320 विमान बंगळुरुहून गोवाला दुपारी रवाना होईल, अशी माहिती एअर इंडियाचे सीईओ मिठ्ठू चांडीयाला यांनी ही माहिती दिली.

दुसरीकडे, स्पाइस जेटने आपल्या तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बंगळुरु-गोवा-बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गावर 1,499 रुपये तिकिट दराची घोषणा केली आहे. 12 जूनपासून स्पाइस जेटची सेवा सुरु होणार आहे.

डीजीसीएतर्फे एअर एशियाला बंगळुरु- गोवा- बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गाला परवानगी दिली आहे. विमान प्रवास तिकिटात 35 टक्के कपात करण्‍यात येणार असल्याचे यापूर्वीच एअरएशि‍याचे सीईओ चांडीयाला यांनी जाहीर केले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा, स्वस्त विमान तिकिटाबाबत...