आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Asia, Mozila, Blackberry, Facebook Latest News In Hindi

1500 रूपयांत मोझिला लॉन्च करणार स्मार्टफोन, स्वस्त होणार झेड-10

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1- 1500 रूपयांमध्ये मोझिला लॉन्च करणार स्मार्टफोन
नवी दिल्लीतील इंटरनेट ब्राऊजर कंपनी मोजिला 1500 रूपयांमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतासोबतच इतर 15 देशांमध्येही लॉन्च होणार आहे.
2 -25 हजारांनी स्वस्त होणार झेड-10
ब्लॅकबेरीचा झेड-10 हा स्मार्टफोन 25 हजार रूपयांनी स्वस्त होणार आहे. 43,490 रूपयांत लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत काही दिवसांपूर्वी 29,990 रूपये करण्यात आली मात्र, आता 15000रूपयांनी स्वस्त झाल्याने हा स्मार्टफोन 17, 990 रूपयात मिळणार आहे.
3- अनक्लेम रकमेची माहिती ऑनलाइन मिळणार
विमा नियामक मंडळाचे नियम बदलणार असून आता विमा धारकांना त्यांच्या पॉलिसीची ऑनलाइन माहिती मिळणार आहे. पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर किती रक्कम मिळणार याची माहिती मिळवता येईल मात्र या रकमेचा क्लेम करता येणार नाही.
4- एअर अशिया, भारतात पाच लाख तिकीट मोफत देणार
भारतात सेवेचा प्रारंभ करण्यासाठी एअर आशियाने भारतात पाच लाख तिकीटे मोफत देणार असल्याचे जाहिर केले आहे. काही निवडक मार्गांवर 18 लाख तिकीटांवर सवलत मिळणार आहे. मात्र ही सुट मिळवण्यासाठी 2 मार्च पर्यंत बुकिंग करावे लागेल.
5- फेसबुक ई-मेल सेवा बंद करणार
फेसबुक ई-मेल सेवा बंद करणार आहे. 2010 मध्ये सुरू झालेल्या ई-मेल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला होता.
पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...