आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Day Celebrations: Airline Offers Tickets For Rs 100 Till 31 August

100 रुपयांत घ्या हवाई सफरीचा आनंद, एयर इंडिया डे निमित्त प्रवाशांना मिळेल संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारी एअरलाइन्स एअर इंडिया 27 ऑगस्टला एअर इंडिया डे साजरा करत आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी एअर इंडियाने 31 ऑगस्टपर्यंत आपल्या प्रवाशांना 100 रुपयांच्या बेस फेअरवर तिकिट देण्याची घोषणा केली आहे. त्यावर टॅक्सही वेगळा लागणार आहे. एअर इंडिया केवळ वेबसाइटद्वारे या तिकिटांची विक्री करत आहे. हा योजनेच्या पहिल्याच दिवशी एअर इंडियाच्या वेबसाईटवर जास्त ग्राहकांनी भेट दिल्याने सेवा ठप्प झाली होती.
एअर इंडिया प्रथमच अशा प्रकारचे सेलिब्रेशन आयोजित करत आहे. आठ वर्षांपूर्वी 27 ऑगस्टलाच इंडियन एयरलाइन्स आणि एअर इंडियाचे विलिनीकरण झाले होते. 27 ते 31 ऑगस्टपर्यंत बूक होणा-या या तिकिटांवर 27 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येइल.
पुढील स्लाइडवर वाचा एअर एशियाची ऑफर
(छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी)