आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Joins Fare War; Offers 30% Discount On All Fare Bands

एअर इंडियाच्या तिकिटांवर 30 टक्के सवलत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्पाइसजेट, इंडिगो, गो एअर या विमान वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांसाठी सवलतीच्या दरातील तिकिटांच्या ऑफर जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी एअर इंडियानेही बुधवारी या दरकपात स्पर्धेत उडी घेतली आहे. एअर इंडियाने निवडक प्रवासी मार्गासाठी ऑफर जाहीर केली. ऑफरनुसार तिकिटांवर 30 टक्के सवलत मिळणार आहे.

एअर इंडियाने शॉर्ट टर्म प्रमोशन सेल बोनान्झा या नावाने ही ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी 27 फेब्रुवारी ते एक मार्च या काळात आरक्षण करावे लागणार आहे. या ऑफरनुसार गोवा-मुंबई मार्गावर एकेरी प्रवासाचे भाडे 1586 रुपये (करांसहित) ठेवण्यात आले आहे. मुंबई ते कोलकाता प्रवासासाठी 3470 रुपये (कर वेगळे) भाडे द्यावे लागणार आहे. तिरुवनंतपुरम-मुंबई एकेरी फेरीसाठी 2557 रुपये तर दिल्ली-लखनऊसाठी 1889 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

एअर आशिया : पाच लाख मोफत तिकिटे
मलेशियाच्या बजेट विमान वाहतूक कंपनीने क्वालालम्पूरहून निवडक मार्गांवर 18 लाख कमी भाड्याच्या आसनांसाठी पाच लाख मोफत तिकिटांची ऑफर जाहीर केली आहे.

एअर आशियाने सांगितले, या ऑफरसाठी दोन मार्चपर्यंत बुकिंग करता येणार आहे. एक ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या 30 एप्रिलपर्यंतच्या काळातील प्रवासासाठी तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. तिकिटांचे आरक्षण बुधवारपासून सुरू झाले आहे. या ऑफरअंतर्गत एअर एशियाने कोची, कोलकाता, तिरुचिरापल्ली, चेन्नई, बंगळुरूहून क्वालालम्पूरसाठी 6999 रुपयांत सेवा देण्याची तयारी केली आहे. चेन्नईहून बँकॉकसाठी 7,999 रुपये भाडे निश्चित केले आहे. कंपनीने या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी उड्डाणाची तयारी दर्शवली आहे. यात सिंगापूर, जकार्ता, मेदान, बाली, बँकॉक, हात याई, सुरत, हो ची मिन्ह आदी शहरांचा समावेश आहे.