आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या आश्वासनानंतर एयर इंडियाच्या वैमानिकांचा संप मागे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या सुमारे ५० वैमानिकांनी शनिवारी अचानक आजारपणाची सुटी टाकल्याने विमानसेवा विस्कळित झाली होती. नियमित वेतन न मिळाल्यामुळे वैमानिक संपावर गेले होते. मात्र सरकारने रविवारी सकाळी आश्वासन दिल्यामुळे वैमानिकांनी आंदोलन मागे घेतले आहे. उड्डाणमंत्री अजितसिंग यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अजितसिंग यांनी एयर इंडियांच्या कर्मचारयांना आश्वासन दिले. ते त्यांनी मान्य केले.
काल वैमानिंकानी अचानक संप केल्याने विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड मोठी गैरसोय झाली. त्यामुळे सरकारच्या धोरणाबाबत टीका होत असल्यामुळे सरकारने लगेच पावले उचलत वेतनाबरोबरच वैमानिकांच्या वेतनभत्त्यातही वाढ करु, असे आश्वासन दिले.
वैमानिकांनी शनिवारी सकाळी आजारी असल्याचे सांगून रजा घेतल्या होत्या. त्यामुळे नागपूर, अहमदाबाद, चेन्नई, लेह, बंगळूर, बागडोग्रा, अमृतसर आणि कोलकत्यासह सुमारे ५२ उड्डाणे रद्द करावी लागली होती. प्रवाशांना इतर कंपन्यांच्या विमानांमार्फत रवाना करण्यात आले. तसेच अनेक उड्डाणांच्या वेळाही पुढे ढकलल्या होत्या.
पगार नाही, तर काम नाही या तत्त्वानुसार रजा टाकण्याचा निर्णय वैमानिकांनी शुक्रवारी रात्रीच घेतला होता. याबाबत वैमानिकांनी पूर्वसूचना दिली नव्हती, तसेच आजारपणाची रजा टाकल्याचे नवनियुक्त नागरी उड्डाणमंत्री अजितसिंग यांनी सांगितले होते.
तसेच एअर इंडियाची आर्थिक स्थिती वाईट असल्याने वैमानिकांना गेले दोन महिने वेतन दिले गेलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पुढील आठवड्यात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्‍न सोडवू व त्यानंतर वैमानिकांशीही चर्चा करू,'' असे अजितसिंग यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी पावले टाकत वैमानिकांना संप मागे घेण्यास भाग पाडले.
एअर इंडियाची विमाने जमिनीवरच, वैमानिकांचा संप