आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India To Fly Board Members In Dreamliner Re run Today

एअर इंडियाची ड्रीमलायनर विमाने घेणार आज भरारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॅटरीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाने खरेदी केलेली बोइंग विमाने गेल्या चार महिन्यांपासून धावपट्टीवरच उभी होती, परंतु आता ही बोइंग 878 ड्रीमलायनर प्रवासी विमाने बुधवारपासून आकाश भरारी घेतील, अशी ग्वाही नागरी हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी दिली आहे.

बोइंग कंपनीच्या या ड्रीमलायनर विमानाच्या बॅटरीमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर ही विमाने गेल्या जानेवारीपासून जगभरातील विविध विमानतळांवर जागच्या जागी उभी होती. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बोइंग कंपनी नवीन बॅटरी विकसित करण्याच्या कामात गुंतली होती. एअर इंडिया ड्रीमलायनरच्या देशांतर्गत विमान वाहतुकीला बुधवारपासून आणि 22 मेपासून आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू करणार असल्याचे स्पष्ट करून सिंग म्हणाले, या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व सहा ड्रीमलायनर भरारीसाठी सज्ज होतील.

डिसेंबरपर्यंत एअर इंडिया आणखी आठ ड्रीमलायनर खरेदी करण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. कंपनीला गतवर्षी 52 अब्ज रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. त्या तुलनेत मार्चअखेरच्या आर्थिक वर्षात 40 अब्ज रुपयांच्या निव्वळ तोट्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.