आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाचे तूर्तास खासगीकरण नाही, विमानतळ प्राधिकरण, पवन हंसचे लिस्टिंग होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि हेलिकॉप्टर निर्मिती करणा-या पवन हंस या कंपन्यांची लवकरच शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. सरकारी विमान प्रवासी वाहतूक कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे राजू यांनी स्पष्ट केले.
एअर इंडियाचे तूर्तास खासगीकरण होणार नसले तरी आगामी काळातही ते होणारच नाही, असे नव्हे असे संकेत राजू यांनी या वेळी दिले. राजू यांनी सोमवारी हवाई वाहतूक क्षेत्रातील नव्या धोरणांचा मसुदा जारी केला. त्यात पवन हंस आणि विमानतळ प्राधिकरण या दोन्ही कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारात करण्याचा प्रस्ताव आहे. प्राधिकरणाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढीसाठी लिस्टिंग गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राधिकरणचा पसारा
विमानतळ प्राधिकरण ही सरकारी मालकीची कंपनी असून देशभरातील विमानतळे या प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. सध्या हे प्राधिकरण १२५ विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. त्यात ११ आंतरराष्ट्रीय, ८१ देशी आणि ८ कस्टम्स विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय प्राधिकरण लष्कराच्या २५ हवाई पट्ट्यांचेही व्यवस्थापन पाहते.