आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air tel Call Rate Hike, Air India Reduced The Fair By 30 Percent

\'एअलटेल\'वरून बोलणे महागले; एअर आशियातर्फे पाच लाख तिकिटे मोफत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील आघाडीवर असलेली मोबाईल कंपनी असलेल्या भारती एअरटेलने काही प्री-प्रेड प्लानवरील कॉल दरात जवळपास 33 टक्क्यांने वाढ केली आहे. त्यामुळे 'एअरटेल'च्या माध्यमातून संवाद साधणे महागात पडणार आहे. दुसरीकडे विमान प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मलेशियातील एअर आशियाने पाच लाख तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच एअर इंडियानेही दरकपातीच्या स्पर्धेत आता उडी घेतली आहे.

एअर इंडियाने निवडक प्रवाशी मार्गावरील अॅडव्हास आरक्षणावर 30 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचीही घोषणा केली आहे. एअर इंडियाने निवडक प्रवासी मार्गासाठी ऑफर जाहीर केली. ऑफरनुसार तिकिटांवर 30 टक्के सवलत मिळणार आहे. एअर इंडियाने शॉर्ट टर्म प्रमोशन 'सेल बोनान्झा' या नावाने ही ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी 27 फेब्रुवारी ते एक मार्च या काळात आरक्षण करावे लागणार आहे. या ऑफरनुसार गोवा-मुंबई मार्गावर एकेरी प्रवासाचे भाडे 1586 रुपये (करांसहित) ठेवण्यात आले आहे. मुंबई ते कोलकाता प्रवासासाठी 3470 रुपये (कर वेगळे) भाडे द्यावे लागणार आहे. तिरुवनंतपुरम-मुंबई एकेरी फेरीसाठी 2557 रुपये तर दिल्ली-लखनऊसाठी 1889 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

स्पाइसजेट, इंडिगो, गो एअर या विमान वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांसाठी सवलतीच्या दरातील तिकिटांच्या ऑफर जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी एअर इंडियानेही बुधवारी दरकपातीचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या ऑफरनुसार 29 मार्च ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रवास करण्यासाठी आरक्षण करता येईल. यात 115 उड्डाणांचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी स्पाइस जेटने तिकिट दरात जवळपास 75 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. यानंतर इंडिगो आणि गो-एअरने तिकिट दरात कपात केली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, 'एअर आशिया'तर्फे पाच लाख तिकिटे मोफत...