आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान प्रवास महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील विमान वाहतूक कंपन्यांनी प्रत्येक तिकिटावर 150 रुपये इंधन अधिभार घेण्याचे ठरवले आहे. नवे तिकीट दर एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यापासून लागू होतील.

जेट एअरवेज आणि एअर इंडियाने त्यांच्या तिकिटांवरील इंधन अधिभार 150 रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यापासून हा निर्णय लागू होणार आहे. देशांतर्गत 1000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 150 रुपये, तर 1000 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रावासासाठी 100 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने इंधन अधिभाराबाबतची त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. इंधन अधिभार वाढवण्यास इंडिगो फारशी राजी नसली तरी येत्या एक -दोन दिवसांत कंपनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. प्रवासी विमान वाहतूक करणा-या गो-एअर आणि स्पाइसजेट या कंपन्यांनी याबाबत आतापर्यंत काहीच भाष्य केलेले नाही.


ऐन सुट्यांत दरवाढ
एप्रिलपासून देशात उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू होतो. या काळात मोठ्या मागणीमुळे विमान तिकिटे नेहमीच महागतात. त्यातच इंधन अधिभाराचा बोजा पडणार असल्याने विमान प्रवास चांगलाच महागणार आहे. विमान वाहतुकीत इंधनावरील खर्चाचे प्रमाण 40 टक्क्यांवर असते. 2008 च्या मंदीपासून विमान वाहतुकीत इंधन अधिभार लावण्याची पद्धत सुरू झाली.