आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AirAsia India Set To Begin Operations From Today

बंगळुरूतून एअर एशियाचे पहिले उड्डाण, 990 रुपयांमध्ये हवाई सफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर एशिया इंडियाने भारतात त्यांची कमर्शिअल सेवा सुरु केली आहे. त्यासोबत देशांतर्गत विमान वाहतूकीत मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. एअर एशियाच्या विमानाने आज दुपारी 3.10 मिनीटांनी बंगळुरूहून गोव्याला उड्डाण केले.
इंडिगो, स्पाइसजेट आणि गो-एअर यानंतर एअर एशिया इंडिया भारतातील चौथी बजट एअरलाइन्स कंपनी ठरली आहे. टाटा समुहाच्या या कंपनीने चेन्नईला मुख्यालय केले आहे. एअर एशिया इंडियाने बंगळुरु - गोवा आणि बंगळुरू - चेन्नई या मार्गावरील तिकीट दर सर्व करांसह 990 रुपये असेल अशी घोषणा केली आहे. यामुळे एव्हिएशन कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा तिकीट वॉर सुरु होण्याची चिन्ह आहेत. स्पाइसजेटने आठ शहरांसाठी मॉन्सून ऑफर जाहीर केली आहे. या तिकीट दरांची सुरवात 1990 पासून आहे.
15 किलोपर्यंतचे सामान निशुल्क
एअर एशिया इंडीयाने 15 किलो पर्यंतच्या सामानाला किरायात सुट दिली आहे. परदेशातील विमान सेवांच्या धरतीवर भारतातही निर्णय घेण्याचे कंपनीने निश्चित केले होते.