आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट विक्री शुक्रवारपासून, एअर एशियाचे पहिले विमान 12 जूनला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टेलेस्ट्रा ट्रेडफ्लेस आणि एअर एशिया यांच्या संयुक्त सहकार्यातील एअर एशिया इंडियाची देशातील विमान सेवा 12 जूनपासून सुरू होत आहे. नव्या विमानसेवेसाठी तिकीट विक्री शुक्रवार, 30 मेपासून सुरू होत आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून एअर एशिया इंडियाला एप्रिलमध्ये आवश्यक परवाना मिळाला होता. विविध कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर नऊ महिन्यांनंतर हा परवाना कंपनीला मिळाला आहे. एअर एशियाचे पहिले विमान 12 जूनला उड्डाण घेणार असून तिकीट विक्री शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. या पहिल्या विमानेसेवचा मार्ग कसा असेल याबाबत मात्र तपशील देण्यात आलेला नाही.