आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AirAsia Tata Joint Venture Gets Govt's Nod To Start New Airline

टाटांचे विमान अखेर झेपावणार, एअर एशियासोबत गुंतवणुकीस मंजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा ग्रुपचे विमान अखेर भरारी घेणार आहे. मलेशियाच्‍या एअर एशियासोबत संयुक्त उपक्रमाने भारतात विमानसेवा सुरु करण्‍यास आज अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिली. त्यामुळे 'आकाश भरारी' घेण्याचे टाटांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.

एअर एशिया ही मलेशियातील बजेट विमान कंपनी आहे. टाटा सन्स लिमिटेड आणि अरुण भाटियांच्या टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस प्रा. लिमिटेड यांच्याशी संयुक्त भागीदारी करुन एअर एशिया भारतात स्‍वस्‍तात विमान सेवा देणार आहे. त्यासाठी एअर एशियाने हवाई उड्डाण क्षेत्रात 49 टक्के गुंतवणुकीची परवानगी मागितली होती. थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणानुसार एअर एशियाला ही परवानगी देण्यात आली. फॉरिन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या विमान कंपनीत एअर एशिया पहिल्या टप्प्यात ८० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. परवानगी मिळाल्‍यानंतर लवकरच विमानसेवा सुरु होण्‍याची अपेक्षा आहे.

किंगफिशर एअरलाईन्‍सची सेवा बंद झाल्‍यानंतर देशातील एक विमानसेवा बंद पडली होती. त्‍यानंतर हा एक नवा पर्याय भारतीयांसाठी उपलब्‍ध होईल.