आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान उद्योगाला 5,840 कोटी रुपयांचा तोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातल्या विमान उद्योगाला एअर इंडियाच्या 3,159 कोटी रुपयांसह एकूण 5,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामकाज तोटा 2012-13 वर्षात झाला असल्याची माहिती मंगळवारी राज्यसभेत देण्यात आली, परंतु 2009-10 पासून ते 2012-13 वर्षापर्यंत एअर इंडिया तसेच खासगी विमान कंपन्यांच्या तोट्याचे प्रमाण कमी झाल्याचा कल दिसून आला आहे.
इंडिगो ही एकच विमान कंपनी अशी आहे की जी 2011-12 वर्षातील 88 कोटी रुपयांचा तोटा वगळता नफ्यामध्ये असल्याचे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

तोट्याचे गणित :
>एअर इंडिया : 2009-10 : 3,373 कोटी रु., 2010-11 : 4,087 कोटी रु., 2011 - 12 : 5,537 कोटी रु., 2012-13 : 3,159 कोटी रु.