आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेलने फोर-जी प्लॅन केला स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोर-जी सेवा वापरणा-या आपल्या ग्राहकांसाठी भारती एअरटेलने डाटा प्लॅन स्वस्त केला आहे. सोमवारी कंपनीने जाहीर केल्यानुसार आता फोर-जी प्लॅन 450 रुपयांपासून सुरू होतील. पूर्वी अशा प्लॅनसाटी किमान 650 रुपये द्यावे लागायचे. कंपनीने प्लॅन 31 टक्के स्वस्त केला आहे. भारती एअरटेलच्या पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि चंदिगड सर्कलमधील ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. कंपनी फोर-जी सेवेअंतर्गत 999 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पॅकेजवर 1000 चित्रपट आणि 100 गेमची लायब्ररी देत आहे.