आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airtel Declare Quarterly Result With 610 Crore Net Profit

भारती एअरटेलची रेकॉर्डब्रेक कमाई; गेल्या तिमाहीतील 610 कोटी रुपये निव्वळ नफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दूरसंचार सेवा देणारी कंपनी 'भारती एअरटेल'ने डिसेंबर 2013 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. एअरटेलला 610 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा नफा सुमारे 115.1 टक्के अधिक असल्याचे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीदरम्यान कंपनीला 284 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. उल्लेखनीय म्हणजे मागील 15 तिमाहीत कंपनीला नुकसानाला सामोरे जावे लागले होते. परंतु गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात रेकॉर्ड ब्रेक वृद्धी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल म्हणाले, इंटरनेट सेवेमुळे ही वृद्धी झाली आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेवून भविष्यात त्यांना सेवा दिली जाईल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, एअरटेलची 3जी सेवा का झाली होती बंद!