आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलणे महागले; AIRTEL, VODAFONE आणि IDEA च्या कॉल दरात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टेलीकॉम कंपनी 'एअरटेल', 'व्होडाफोन' आणि 'आयडिया'च्या प्रीपेड ग्राहकांना महागाईची झळ बसणार आहे. बहुतांश टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या काही टॅरिप पॅकच्या दरात वाढ केली आहे. काही व्हाउचर्सची व्हॅलिडिटीही कमी केली आहे. दुसरीकडे एअरटेलने आपल्या इंटरनेट पॅकचे दर वाढविले आहेत.

एअरटेलने आपल्या 125 रुपयाचे इंटरनेट पॅकची व्हॅलिडिटी 21 दिवसांची केली आहे. याआधी या पॅकची व्हॅलिडिटी 28 दिवसांची होती. याचबरोबर 1GB इंटरनेट डाटा असलेल्या इंटरनेट पॅकसाठी आता 170 रुपये मोजावे लागणार आहे. 46 रुपये व्हाउचरवर मिळणार्‍या फायद्यात कपात केली आहे. 46 रुपयांच्या रिचार्जवर सर्व एसटीडी आणि स्थानिक कॉल 50 पैसे प्रति मिनिटप्रमाणे आकारले जाणार आहेत.

पुढील स्लाइड्स वाचा, व्होडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना किती बसेल झळ...