आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Roy Bacchan Inaugurate Kalyan Jewelers Pune Branch

कल्‍याण ज्‍वेलर्सच्‍या पुण्‍यातील दालनाचे उद्‍घाटन करणार ऐश्‍वर्या राय बच्‍चन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सोन्याचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत प्रथमपासून जाणीव निर्माण करण्यात आघाडीवर असलेली कल्याण ज्‍वेलर्स कंपनी देशातील ५० वी शाखा येत्या आठ जुलै रोजी पुण्यात सुरु होणार आहे. त्‍याचे उद्‍घाटन प्रसिध्द अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन करणार असल्‍याची माहिती अध्यक्ष टी. एस. कल्याणरामन यांनी दिली आहे.

चालू आर्थिक वर्षात 1600 कोटी रुपये खर्चून देशात आणि परदेशात मिळून आणखी 20 शाखा सुरु केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातसह दक्षिणेकडील राज्ये मिळून गेल्या वर्षी १५ नव्या शाखा सुरु करण्यात आल्या. गतवर्षीची आर्थिक उलाढाल दहा हजार कोटी रुपये आहे. फोर्ब्ज प्रसिध्द करत असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत कल्याणरामन यांचा समावेश आहे. पुढील तीन वर्षात आणखी 80 शाखा सुरु करण्याची कंपनीची योजना आहे

देशातील सर्वाधिक शाखा असलेली कल्याण ही सर्वात मोठी सोने आणि दागिने विक्री करणारी कंपनी आहे. नव्या शाखा छोट्या शहरात सुरु केल्या जाणार आहेत. तसेच पश्चिम आशिया आखाती देश आणि मलेशिया सिंगापूर श्रीलंका येथेही शाखा सुरु केल्या जातील. आगामी आर्थिक वर्षात उलाढाल 13 हजार कोटी रुपयावर जाईल असा अंदाज आहे. फाईट अगेन्स्ट इम्प्युअर गोल्ड अशी मोहीम कंपनी राबविते.